कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाका, असे आदेश देत, यामध्ये कुचराई करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी येथे दिला.कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांच्या कृषीविषयक योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, साखर आयुक्तालय, साखर कारखाने या सर्वांनी एकत्र येऊन मृद संधारणाचा आराखडा तयार करावा. यामध्ये १०० टक्के ठिबकवर शेती, शेतीचा फेरपालट, जमिनीत कर्ब कायम ठेवण्यासाठी उपाययोजनांचा समावेश करून याबाबतचा आराखडा सादर करावा, असे आदेश मंत्री बोंडे यांनी दिले. विषमुक्त अन्न निर्माण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीत शेती करतील, अशांना निश्चितपणे शासन पाठबळ देणार आहे. तसेच शेतकºयांना बोगस बियाणे, खते पुरविणाºया कंपन्यांविरोधात जे शेतकरी ग्राहक न्यायालयात गेले आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा, असेही आदेश त्यांनी दिले.>...तर कृषी सहायकांचा सत्कारकृषी सहायकांनी ग्रामपंचायतीमध्ये बसावे, अशा निर्देशाचे ग्रामविकास सचिवांचे चार वर्षांपूर्वीचे पत्र आहे.कृषी सहायक त्याचे पालन करतात की नाही? ते गावात भेटी देतात की नाही, याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश देऊन ग्रामपंचायतीमध्ये बसणाºया कृषी सहायकांचा सत्कार करू, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांना फसविणा-या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार - कृषिमंत्री बोंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:17 AM