शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरकारकडून दहशतीचे राजकारण

By admin | Published: February 19, 2016 1:22 AM

पृथ्वीराज चव्हाण : आम्हीसुद्धा त्यांचे घोटाळे तडीस नेऊ

सांगली : घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करावी, पण विनाकारण त्रास देण्याचा हेतू नसावा. द्वेषबुद्धीने सरकारविरोधी नेत्यांना लक्ष्य करून कारवाईच्या माध्यमातून दहशतीचे राजकारण करीत आहे. एका वर्षाच्या कालावधित भाजप सरकारने केलेले घोटाळेही आम्ही तडीस नेऊ, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. चव्हाण म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जे नेते आक्रमक होऊ पाहत आहेत, त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तुरुंगात टाकण्याची भाषाही केली जात आहे. अशापद्धतीने दहशत दाखवून विरोधातील आवाज दडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. घोटाळ्यांची चौकशी करताना राजकारण करू नये. एका बाजूला स्वत:च्या सरकारचे घोटाळे लपवायचे आणि विरोधकांच्याच घोटाळ्यांवर लोकांचे लक्ष कसे केंद्रित होईल, याची व्यवस्था करायची, असे धोरण भाजप सरकार राबवित आहे. आम्ही त्यांच्या या दहशतीला भीक घालणार नाही. त्यांच्या घोटाळ्यांबाबत आम्ही आक्रमक झालो नव्हतो, पण आता आम्ही ते घोटाळे तडीस नेऊ. यामध्ये चिक्की घोटाळा, तावडेंच्या शिक्षणाचा मुद्दा, डाळीचा घोटाळा यांचा समावेश आहे. विभागीय राजकारण आम्ही कधीच केले नाही. विदर्भ, मराठवाड्यात कामे होऊ नयेत, अशी भूमिकाही आमची कधीच नव्हती. तरीही याप्रकारचे चित्र रंगवून काही नेते राजकारण करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्न तसेच आहेत. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणतेही उपाय नाहीत. कधी नव्हे इतक्या आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यात झाल्या. त्यामुळे सर्वच ठिकाणी हे सरकार अपयशी ठरलेले आहे. दिशाहीन आणि विस्कळीत झालेले हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)डाळीचा घोटाळा सरकारचाचसचिवांची टिपणी डावलून मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात डाळीवरील साठाबंदी उठविली. आघाडी सरकारने सात वर्षे ती ठेवली होती. हे वास्तव असताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या नावे खापर फोडणे चुकीचे आहे. त्यांनी सभागृहात दिलेली माहिती चुकीची आहे. आम्ही शिस्तभंगाच्या कारवाईसाठी प्रयत्न करणार, असा इशारा चव्हाण यांनी दिला. कसला हा व्यवहार...‘स्मार्ट सिटी’साठी म्हणे शंभर कोटींची तरतूद प्रतिवर्षी केंद्र सरकारने केली आहे. दुसरीकडे एलबीटी रद्द करून सहा हजार कोटी रुपये हक्काचे उत्पन्न बुडविले. एवढ्या मोठ्या रकमेवर पाणी सोडून शंभर कोटीची योजना आणण्याचा हा सरकारचा कसला व्यवहार आहे?, असा सवाल त्यांनी केला. सरकार पडेल!मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील भाजप-शिवसेनेत जोरदार मतभेद होऊन, हे सरकार अल्पमतात येण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेलाही भाजपचे वागणे पटत नसल्याने, लवकरच ते त्यांचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. ...तर राजकारण सोडून देतोकेंद्र सरकारच्या निकषानुसार उत्पन्नाच्या २३ टक्के कर्ज राज्य सरकारांनी घ्यायचे बंधन असते. गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधित आमच्या सरकारने कधीही हा आकडा १९ टक्क्यांवर जाऊ दिला नाही. विद्यमान सरकारने त्यामुळे कर्जाचा बाऊ करू नये. खरोखरच सरकारमध्ये क्षमता असेल, तर त्यांनी राज्याचे कर्ज १ टक्का तरी कमी करुन दाखवावे. तसे त्यांनी केले, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.