शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी

By admin | Published: March 16, 2017 12:52 AM

अंतिम रेखांकन नामंजूर प्रकरण : बिल्डर न्यायालयात; न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

कोल्हापूर : बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी मंजूर केलेले अंतिम रेखांकन नंतर नामंजूर केल्यामुळे येथील एका बिल्डरने महानगरपालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचले असून, त्यांच्याविरोधात फौजदारी दाखल केली आहे. त्यानुसार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सी. आर. पी. सी. कलम २०२ प्रमाणे चौकशी करण्याचे निर्देश राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांना दिले आहेत. येथील बांधकाम व्यावसायिक भूषण गांधी व महंमद जमादार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती सांगितली. महानगरपालिकेच्या हद्दीतील जवाहनगर येथील रि.स.नं. ६२३ अ/४ आणि ६२४/२ या ठिकाणी बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी गांधी व जमादार यांनी रीतसर बांधकाम परवाना मागितला होता; पण डीपी रोडवरील अतिक्रमण काढण्याची अट घालून अंतिम रेखांकनला (लेआउट) मंजुरी देण्यात आली होती. अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असताना ती बांधकाम व्यावसायिकांवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते काढण्यात आले नाही म्हणून काही महिन्यांनी अंतिम रेखांकनच रद्द करण्यात आले. त्यामुळे गांधी व जमादार यांनी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, विद्यमान आयुक्त पी. शिवशंकर, यांच्यासह एकूण २0 जणांविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला आहे. (प्रतिनिधी) अटींची पूर्तता केली नाही म्हणून भूषण गांधी व महंमद जमादार यांना अंतिम रेखांकन मंजूर करताना तसेच बांधकाम परवानगी देताना डी. पी. रोडवरील अतिक्रमण काढून संबंधितांचे पुनर्वसन करण्याची अट घालण्यात आली होती. ती त्यांनी मान्य केली. त्यानंतर त्यांना मंजुरी देण्यात आली. एकदा मंजुरी मिळाल्यावर गांधी व जमादार आपली जबाबदारी झटकायला लागले; म्हणूनच आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांची परवानगी व अंतिम रेखांकन नामंजूर केले, असा खुलासा उपायुक्त विजय खोराटे यांनी केला आहे.