शित्तूर-वारुण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या आठ दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
या विभागातील वारणा, काणसा खोऱ्यामध्ये प्रथमच या दिवसांत सलग आठ दिवस पाऊस पडला. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मका व कलिंगड या पिकांना गारपीट, पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.