शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:36 PM

भादोले-शिगाव रस्ता मुळावर : पूरभागात रस्ता वाढविण्याचा उद्योग कशासाठी : पाणी उतरेना, पिकांचा चिखल

शरद यादव

कोल्हापूर : संभापूर-कवठेमहांकाळ राज्यमार्ग १५३ चे काम २०२०-२१ ला करण्यात आले. यावेळी भादोले-शिगाव दरम्यान रस्त्याची उंची तब्बल पाच फुटांनी वाढविण्यात आली तसेच या पाच किलोमीटरचे पाणी जाण्यासाठी केवळ तीन फुटी सिमेंटची पाइप टाकण्यात आली. यामुळे भादोलेसह किणी, घुणकी, चावरे, जुने पारगाव, निलेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील, तर सांगली जिल्ह्यातील शिगाव, कणेगाव, ऐतवडे या गावांतील शेती पाऊस थांबून आठवडा झाला तरी पाण्याखाली आहे. पूरपट्ट्यात रस्ता करताना वाढविला नाही तर पूर काळात रस्ता सात ते आठ दिवस बंद राहील असे सांगितले जाते. परंतु, रस्ता बंद झाल्यास काही आभाळ कोसळणार नाही, पण ९ ते १० गावांतील पिकांचा चिखल झाला तर हजारो कुटुंबे उद्ध्वस्थ होतील याचा विचार कोण करणार.यंदा जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली व काही ठिकाणची पिके वाचली. मात्र, भादोले परिसरात नदीकाठच्या दोन किलोमीटर भागात बाटलीत भरल्यासारखे पाणी आहे तसेच आहे.यंदा भादोलेजवळच्या आठ गावांत २००५, २०१९ व २०२१ पेक्षा जास्त लांबपर्यंत पुराचे पाणी आले होते. वारणा नदीतून पाणी पुढे जाण्यासाठी शिगाव-भादोले येथे रस्ता कमी ठेवणे गरजेचे होते. परंतु, येथेच रस्ता तब्बल ५ फूट वाढविला आहे. तसेच या पाच किलोमीटर परिसरातील पाणी केवळ एका सिमेंटच्या पाइपमधून पलीकडे जाईल असा विचार करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील तर शेतकरी जगणार कसा, हाच प्रश्न आहे.

कोरेगाव-भादोले दरम्यान नवा पूल कशासाठी..भादोले ते कोरेगाव दरम्यान २०२२ साली नव्या पुलाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला. यंदा या पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, दोन्ही गावच्या शेतकऱ्यांची मागणी नसताना केवळ शासनाचा पैसा आहे म्हणून कर खर्च, या भावनेतून पूल उभारला गेला. यंदा या पुलामुळे पुराचे पाणी तीन किलोमीटरपर्यंत पसरल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पूल नाहीत तेथे पूल बांधायचे सोडून मागणी नसेल तेथे पूल बांधायचा उद्याेग बांधकाम विभागाला सुचतोच कसा...

जयंतरावांचे केवळ आश्वासन२०२१ साली पूर पाहणी करताना तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांना भादोले येथील शेतकऱ्यांनी अडवून ठिकठिकाणी मोऱ्या बांधण्याची मागणी केली होती. जयंत पाटील यांनी यावर कामाचे आश्वासनही दिले होते; पण नंतर सरकार गेले अन् जयंतरावांचा शब्दही महापुरातून वाहूून गेला.

किणी येथील विचारे मळ्यात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असून, २०१९च्या तुलनेत पाणी पातळी जास्त दिवस राहिल्याने पिके कुजून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भविष्यात शेती करणेच अवघड झाले आहे. - राजेंद्रकुमार पाटील, किणी

काय केले पाहिजे..

  • भादोले-शिगाव दरम्यान पाच ठिकाणी मोऱ्या बांधण्याची गरज
  • या रस्त्याची उंची कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लगतील
  • अनेक शेतकऱ्यांनी रस्त्याकडेच्या नाल्या बुजवल्या आहेत, त्या पूर्ववत करणे गरजेचे आहे.
  • कोरेगाव-भादोले दरम्यान नव्या पुलाचा घाट कुठल्या बुद्धिवंतांच्या डोक्यात आला याचा शोध घ्यावा
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरroad transportरस्ते वाहतूकfarmingशेती