शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

विकासाची कोटींची उड्डाणे कागदावरच

By admin | Published: March 27, 2017 3:04 PM

अंबाबाई मंदिर विकास आराखडा, चर्चा, सुचना, दुरुस्त्या, बदल

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांचा फेरा सात वर्षांनंतरही सुटलेला नाही. मंदिराच्या पहिल्या १२० कोटींच्या आराखड्यापासून सुरु झालेला हा प्रवास ५० कोटी, पुढे सुचना दुरुस्त्या करून २५० कोटी, पहिला टप्पा ७० कोटींचा आणि आता ९० कोटींची उड्डाणे कागदावरच झाली आहे. पहिल्या टप्प्यातील सुधारीत आराखड्याला महापालिकेचा सभेत मंजूरी मिळाली आहे. मात्र तो शासन दरबारी मंजुरी गेला की नव्या चर्चा, सादरीकरण, सुचना, बदल आणि फेरआराखडा या फेऱ्यातून करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सुटका होण्याची काही सकारात्मक चिन्हे दिसेनाशी झाली आहेत.

एखाद्या देवस्थानालादेखील लालफितीच्या शासकीय कारभाराच्या दुर्देवाचा फेरा कसा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणून आता अंबाबाई मंदिर सांगता येईल. सन २०१० सालापासून सुरु झालेले आराखड्याचे फेरे सात वर्षांनंतरही थांबलेले नाहीत. साडेतीन शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराला दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत असताना अंबाबाई मंदिराचे जतन संवर्धन, भाविकांसाठी अन्नछत्र, यात्री-निवास पार्कींग सारख्या सोयीसुविधा निर्माण करण्यात अद्याप महापालिका आणि देवस्थान समितीला यश आलेले नाही.

केशवराव भोसले नाट्यगृहाचे नुतनीकरण २०१४ साली सुरु झाले आणि हे काम दीड ते पावणे दोन वर्षात संपले. आता दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी सुरु झाली आहे. कोल्हापूर चित्रनगरी विकास कामांचा नारळ फुटून आता तेथे दिमाखात नवे भव्य सेट उभारले जात आहेत. गेल्या वर्ष दीड वर्षात बनवण्यात आलेल्या जोतिबा मंदिराच्या २५ कोटींच्या आराखड्यालाही शासनाने काही दिवसांपूर्वी मंजूरी दिली. मात्र सर्वात आधी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार होवूनही हा प्रस्ताव अद्याप शासनाला सादरदेखील झालेली नाही. असे झाले आराखडे

-कोल्हापूर शहराचा दोन हजार कोटींचा आराखडा -हा आराखडा नाकारत केवळ अंबाबाई मंदिराचा १२० कोटींचा आराखडा-१९० कोटींचा आराखडा-आराखड्याचे टप्पे करुन ५० कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव-शहरातील रस्ते, पार्कींग, पर्यटन स्थळांचा समावेश करुन २५० कोटी -पहिल्या टप्प्यासाठी ७२ कोटींचा आराखडा - त्यावर दोन वर्षे फक्त चर्चा, सुचना, स्फुटणी, आॅडीट, दुरुस्त्या. -अन्य बाबींचा समावेश करुन पहिला टप्प्याचा आराखडा ९० कोटींचा .