शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

उजळाईवाडीत कोट्यवधींचा गुटखा जप्त- महामार्ग पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:07 AM

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून हैदराबादकडे जाणाऱ्या दोन ट्रकमधून उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा पानमसाला ( गुटखा ) जप्त केला. या ट्रकमध्ये

ठळक मुद्देदोन ट्रकसह चालक ताब्यात, अडीचशेपेक्षा जास्त पोती मुद्देमाल

उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून हैदराबादकडे जाणाऱ्या दोन ट्रकमधून उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा पानमसाला ( गुटखा ) जप्त केला. या ट्रकमध्ये हिरा पान मसाल्याने भरलेली २५० पोती सापडली. ही कारवाई सोमवारी सकाळी ८.१५ वाजता उजळाईवाडी येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन ट्रकसह सलमान अमितखान (वय २५, रा. अहमदनगर) व परवेज अजीज उल्ला खान (४०, रा. औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे.

उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या समोर ट्रक (क्र. एमएच ११ ए ५५०५ व एमएच २१ एक्स ७७४०) याचे चालक सलमान अमितखान (वय २५, रा. अहमदनगर) व परवेज अजीज उल्ला खान (४०, रा. औरंगाबाद) यांचा संशय आल्याने महामार्ग पोलिसानी त्यांची चौकशी केली. त्यावेळी दोन्ही ट्रकमध्ये हिरा पान मसाला नावाच्या गुटख्याची २५0 ते ३00 पोती सापडली.

याबाबत ट्रॅफिक पोलिसांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांना कल्पना देत दोन ट्रक व चालकांना ताब्यात घेतले आहे. याबरोबर अन्न भेसळ प्रतिबंध खात्याच्या अधिकाऱ्यांनाही या कारवाईची कल्पना देण्यात आली. या पान मसाल्याची अंदाजे किमत पावणे दोन कोटी असल्याचा अंदाज आहे. या कारवाईमध्ये महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पोवार, सपोनि जगन्नाथ जानकर, सहा. फौजदार शंकर कोळी, पोलीस हवालदार संदीप पाटील, तात्यासाहेब मुंढे, रवींद्र नुल्ले, प्रकाश कदम, शहाजी पाटील, योगेश कारंडे, अभिजित चव्हाण, तौसिफ मुल्ला, आशिष कोळेकर, रामदास मेंटकर यांनी सहभाग घेतला.चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे...पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतल्यानंतर चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. चालक हे ट्रक घेऊन साताºयाहून हैदराबादकडे निघाले होते; पण प्रत्यक्षात ट्रक हे उचगाव ब्रीज खालून हुपरी रोडकडे जाणार होते असे एका ट्रकचालकाने सांगितले.दुसरा चालक म्हणत होता की, आम्ही लक्ष्मी टेकडी कागलकडून आलो आहोत. मग लक्ष्मी टेकडीकडून येणारी वाहने पुण्याकडे जाणार. ट्रक नेमके कोठून कोठे चालले होते याची माहिती ट्रकचालक लपवण्याचा प्रयत्न करत होते.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे महामार्ग पोलिसांनी दोन ट्रकमधून पावणे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. सपोनि अविनाश पोवार, सपोनि युवराज खाडे, अन्न व औषध प्रशासनचे आर. पी. पाटीलसह त्यांच्या सहकाºयांनी सोमवारी ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीtraffic policeवाहतूक पोलीस