शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

जिल्हा बँकेला साडेबारा कोटी नफा

By admin | Published: April 04, 2017 1:36 AM

फिनिक्स भरारी : ७५ कोटींचा संचित तोटा कमी होऊन नफा : ‘सीआरएआर’ १०.२१ टक्के; लाभांशही देणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ७४ कोटी ८१ लाखांचा संचित तोटा कमी करून १२ कोटी ४६ लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. बॅँकेने या आर्थिक वर्षात चारशे कोटींच्या ठेवी वाढवत १०.२१ टक्के ‘सीआरएआर’ (भांडवल पर्याप्तता) राखण्यात यश मिळविले आहे. नोटाबंदी, त्यानंतर रिझर्व्ह बॅँकेने चलन पुरवठ्यात केलेला दुजाभाव व कर्जमाफीची चर्चा यामुळे बॅँकेला कोट्यवधीचा फटका बसूनही केवळ संचालक मंडळाची आर्थिक शिस्त व सचोटीच्या बळावर बॅँकेने फिनिक्स पक्षाप्रमाणे शून्यातून गगनभरारी घेण्याची कामगिरी केली आहे. सहा वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर दोन वर्षांपूर्वी सभासद नियुक्त संचालक मंडळ कार्यरत झाले. प्रशासकांनी बॅँकेला ‘आयसीयू’मधून बाहेर काढले होते, पण धोका टळला नव्हता. २०१५-१६ मध्ये बॅँक थोडी प्रगतीपथावर आली, पण रिझर्व्ह बॅँकेने मार्च २०१७ पर्यंत ९ टक्के ‘सीआरएआर’ पूर्ण करणे बंधनकारक केले होते, अन्यथा परवान्यावर गंडांतर येणार होते. त्यामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षात नवीन कर्जपुरवठा व वसुलीवर लक्ष केंद्रित केले, पण ८ नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णयाने बॅँकेपुढे पुन्हा संकट उभे राहिले. साडेतीनशे कोटींच्या नोटा बॅँकेत पडून राहिल्या, त्याचबरोबर चार महिन्यांत व्यवहार ठप्प झाले. त्यात कर्जमाफीतील ११२ कोटी पात्र असल्याच्या न्यायालयाने निकालाने हप्ते भरण्यास शेतकऱ्यांची टाळाटाळ सुरू आहे. कर्जमाफीच्या चर्चेमुळे परतफेडीवर परिणाम झाला. या सगळ्यांचा बॅँकेला किमान १५ ते २० कोटींचा फटका बसला. तरीही बॅँकेने मार्च २०१७ अखेर ८७ कोटी २७ लाखांचा नफा कमावला. त्यातून संचित तोटा वजा करता १२ कोटी ४६ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. दहा वर्षांनंतर संस्थांना लाभांश !बॅँक २००७-०८ मध्ये संचित तोट्यात गेल्याने तेव्हापासून संस्था सभासदांना लाभांश दिला नव्हता. गेले दहा वर्षे कोट्यवधीचे भागभांडवल जिल्हा बॅँकेत पडून राहिल्याने संस्थांना मोठा झटका बसला होता. अखेर या आर्थिक वर्षात संचित तोटा कमी होऊन बॅँक निव्वळ नफ्यात आल्याने सभासदांना किमान ५ टक्के लाभांश मिळणार आहे. सहकार खात्याची परवानगी घेऊन तो १० टक्क्यापर्यंत कसा देता येईल, याची तयारी संचालकांनी केली आहे. तपशील२०१४-१५२०१५-१६२०१६-१७ठेवी२८८९ कोटी ७५ लाख३२७१ कोटी ६७ लाख३६०० कोटी ६३ लाखभागभांडवल१४६ कोटी ६९ लाख१५६ कोटी ३३ लाख१६५ कोटी ४६ लाखयेणे कर्ज२१६७ कोटी२४४९ कोटी २० लाख२५०२ कोटी ६२ लाखएन. पी. ए.१६९ कोटी ९१ लाख१६८ कोटी १५ लाख१३८ कोटी ९२ लाखनफ/ तोटा८ कोटी ४४ लाख (तोटा)२८ कोटी ३२ लाख (नफा)८७ कोटी २७ लाख (नफा)संचित तोटा१०३ कोटी १३ लाख७४ कोटी ८१ लाख-सीआरएआर७ टक्के७.२ टक्के१०.२१ टक्के कर्मचाऱ्यांचा जल्लोषकोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा संचित तोटा कमी होऊन १२ कोटींचा निव्वळ नफा झाल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी बँकेच्या दारात फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. बँक नफ्यात आल्याचा आनंद आणि त्यात अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचा आज, मंगळवारी वाढदिवस आहे, पण कर्मचाऱ्यांनी सोमवारीच केक कापून बँकेत आनंदोत्सव साजरा केला. सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयाचे प्रवेशद्वार रांगोळी व फुलांच्या माळांनी सजवले होते. बँक नफ्यात आल्याची अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी घोषणा करताच फटाक्यांची आतषबाजी करत साखर व पेढे वाटून कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक निवेदिता माने, पी. जी. शिंदे, विलास गाताडे, संजय मंडलिक, भैया माने, संतोष पाटील, अनिल पाटील, उदयानी साळुंखे, प्रतापसिंह चव्हाण, अनिल साळोखे आदी उपस्थित होते. ‘पी.जीं’नी केक भरवला!बॅँकेच्यावतीने केक कापून मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा केला. भाजपचे संचालक पी. जी. शिंदे यांनी मुश्रीफ यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या. अप्पींची दांडीजिल्हा परिषद पदाधिकारी निवडीमुळे बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील हे कमालीचे तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. उपाध्यक्ष कुठे आहेत? अशी विचारणा करत निवेदिता माने यांनी संचालकांची फिरकी घेतली.