शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जोतिबावर भाविकांची गर्दी

By admin | Published: October 10, 2016 12:50 AM

पाच कमळपुष्प पाकळ्यांत महापूजा

जोतिबा : नवरात्रौत्सवाच्या नवव्या माळेला जोतिबा देवाची पाच कमळपुष्प पाकळ्यांत महापूजा बांधण्यात आली. नवव्या माळेला रविवार असल्याने जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. सकाळी दहा वाजता धुपारती सोहळा यमाई मंदिराकडे वाजतगाजत गेला. रविवार असल्याने जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराभोवती चार-पाच पदरी दर्शनरांग ही मंदिराबाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत पोहोचली होती. दर्शनरांग व्यवस्थेसाठी पोलिस, देवस्थान समिती, हक्कदार पुजारी समितीचे कर्मचारी व ज्योतिर्लिंग हायस्कूलचे विद्यार्थी तैनात होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. रात्री ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. जोतिबा मंदिरात सोमवारी सकाळी आठ वाजता श्रींचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघणार आहे. धुपारती सोहळ्याने जोतिबा, यमाई, तुकाई, भावकाई मंदिरांतील घट उठविण्याचा विधी होईल. खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन विधी तसेच कर्पुरेश्वर तीर्थावर दिवे सोडण्याचा विधी होणार आहे.