दशभूजा गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:30 PM2019-05-18T18:30:25+5:302019-05-18T18:39:55+5:30
शाहूपुरी सातवी गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शनिवारी पहाटेपासून दशभूजा गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत दर्शनाचा योग होता.
कोल्हापूर : शाहूपुरी सातवी गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शनिवारी पहाटेपासून दशभूजा गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत दर्शनाचा योग होता.
पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त मंदिरात पहाटे योगेश कुलकर्णी यांनी विधिवत अभिषेक घालून पूजा केल्या. त्यानंतर घंटानाद करून पाच वाजल्यापासून मंदिरदर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर दिवसभर दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होता. मंदिराच्या वतीने बाहेर प्रसाद वाटप करण्यात येत होता. भाविकांनी त्याचा लाभ घेतला. रात्री १२पर्यंत योग असल्याने दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पुष्टिपती जयंतीनिमित्त दशभूजा गणेश म्हणजे १० हात भूजा असलेल्या गणपतीचे दर्शन घेणे व पुष्टिपती स्रोत वाचन करणे फार महत्त्वाचे असते. तसेच राजयोग, लक्ष्मीयोग व पौर्णिमयोग या तिन्हीच्या एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मीळ योग म्हणजे पुष्टिपती विनायक जयंती होय. त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्वाचे आहे.
नेपाळ, नाशिक, बेळगाव, पुणे यानंतर कोल्हापुरातील एकमेव असलेली दशभूजा गणेशमूर्ती सातवी गल्ली येथे आहे.
याप्रसंगी मंदिराचे स्वप्निल नाईकनवरे, अजय पाटील, उदय कुंभार, राजू पठाण, सुनील पाटील, उदय डवरी, निखिल कुंभार, सतीश वडणगेकर, किसन घोडके, युवराज चौगुले, शुभम कुंभार, बाळू नागवेकर, ओंकार पाटील, भाऊराजे निपाणीकर यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.