दत्ता लोकरे सरवडे: राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुदाळतिट्टा येथे आज बाळूमामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाहनांची गर्दी तसेच राधानगरी- निपाणी मार्गावर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाला पर्यायी वाहतूकीसाठी पूल नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. सकाळी दहा वाजले पासून ते दोन वाजेपर्यंत यामार्गावर वाहतुकींची कोंडी झाली. यामुळे वाहनधारकांचे वृद्धांचे, विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.मुदाळतिट्टा या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अमावस्या दिवशी बाळूमामाच्या दर्शनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. राधानगरी -निपाणी या मार्गावरती काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावर अकरा दिवसापासून नवीन पूल बांधकाम सुरु केले आहे. या पुलाला वाहतुकीसाठी पर्यायी पूल नाही. दरम्यान गारगोटी कोल्हापूर रस्त्यावर उजव्या कालव्यावरच असलेले नादुरुस्त फुल यावरूनच वाहतूक सुरू आहे. या पुलावरूनच राधानगरी, कोल्हापूर, निपाणी अशी मोठी वाहने वळसा घेऊन जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहनधारकांच्या मुदाळ, बोरवडे पाटी, बिद्री,आदमापूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक भाविकांनी शेतवडीमध्येच किंवा मिळेल तेथे गाड्या लावून बाळूमामाच्या दर्शनासाठी जाणे पसंत केले.
kolhapur news: बाळूमामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, वाहतुकीची कोंडी; वाहनधारक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 2:01 PM