शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

पन्हाळ्यावर प्री-वेडिंग फोटोसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:52 AM

नितीन भगवान । पन्हाळा : पारंपरिक पद्धतीने विवाह करणे आता नव्या पिढीला रुचत नसल्याने काहीतरी हटके आणि वेगळे करण्याचे ...

नितीन भगवान ।पन्हाळा : पारंपरिक पद्धतीने विवाह करणे आता नव्या पिढीला रुचत नसल्याने काहीतरी हटके आणि वेगळे करण्याचे ठरते. यातील विवाहपूर्व (प्री-वेडिंग) छायाचित्रणासाठी पन्हाळ्यावर गर्दी होऊ लागली आहे.रुढी-परंपरेनुसार प्रत्येक धर्माची विवाह करण्याची पद्धती वेगळी असली तरी यात सर्वांत महत्त्वाचे ठरते ते फोटोसेशन, पण हेसुद्धा पारंपरिकच. नव्या पिढीला आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर बोलता यावे, ओळख व्हावी, स्वभाव कळावा या हेतूने विवाहपूर्वी एकमेकांना भेटता यावे यादृष्टीने नवा फंडा निर्माण झाला. याचा परिणाम म्हणजे लग्नापूर्वी फोटोसेशन केले जाते. खरंतर हेतू चांगलाच आहे, पण फोटोसेशनमध्ये काहीतरी वेगळे करण्याचे ठरते व झाडावर चढ, उंच कड्यावर चढ आणि वेगळ्या पद्धतीने फोटो काढताना बºयाचवेळा अपघात होतात. याची नोंद कुठेही होत नाही. या अपघातामुळे होणारे विवाह लांबणीवर पडतात अथवा कटुता येते. मग असे हटके फोटो सेशन विवाहपूर्व हवेतच का? असाही प्रश्न पडतो.पन्हाळ्यावर ऐतिहासिक इमारती भरपूर आहेत. या ठिकाणी पुरातत्त्व विभाग छायाचित्र अथवा छायाचित्रणासाठी कसलीही परवानगी देत नाही. या ठिकाणी हे प्री-वेडिंग फोटोसाठी गर्दी होते. विषेशत: तीन दरवाजा, अंधारबाव व नायकिणीचा सज्जा या ठिकाणी हे फोटोसेशन होत असता पुरातत्त्वचे कर्मचारी व फोटोग्राफर यांच्यामध्ये भांडणे, प्रसंगी हातघाई होते. यातून पन्हाळ्याविषयी गैरसमज पसरवला जातो, खरंतर पन्हाळा पोलिसांनी याविषयी लक्ष घालणे जरुरीचे आहे. ऐतिहासिक, पौराणिक व निसर्गाने नटलेल्या या पन्हाळ्यावर आता आणखीन एक नवी ओळख निर्माण होते आहे. प्री-वेडिंग फोटोसेशन पण यासाठी लागणाºया परवानग्या अथवा त्याची नोंद असावी इतकीच माफक अपेक्षा आहे. निसर्गाने भरलेल्या पन्हाळ्यावर फोटो सेशन करताना पुसाटी बुरुज, तानपीर परिसर हा भाग वनविभागाकडे आहे. याठिकाणी प्री-वेडिंगचे फोटो घ्यावयाचे असतील तर वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे वनरक्षक व्ही. टी. दाते यांनी सांगितले.