कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगरकडून वाय. पी. पोवारनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा गटारींसाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट पाईप निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. हे काम नगरोत्थान योजनेमधून सुरू असून, या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.केंद्र शासनाची असलेली नगरोत्थान योजना अगोदरच या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. यापूर्वी या योजनेमधून करण्यात आलेल्या रस्त्यांप्रश्नी शहरवासीयांनी आवाज उठविला आहे. यामुळे या योजनेमधील ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले आहे. आता स्टेशन रोड, गोकुळ हॉटेल ते आयसोलेशन हॉस्पिटल या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून पाण्याचा निचरा होण्यासाठी (स्ट्रॉम वॉटर) ही पाईपलाईन टाकण्यात येत आहे. परंतु, यासाठी वापरण्यात येणारी पाईप निकृष्ट दर्जाची वापरली आहे. सध्या शिवाजी उद्यमनगरातील वालावलकर रुग्णालयापासून वाय. पी. पोवारनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकण्यासाठी ही पाईपलाईन आणली आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या पाईपवरील सिमेंटचे तुकडे निघत आहेत. यामध्ये कमकुवत सळी व सिमेंट वापरल्याचे स्पष्ट दिसत आहे.या कामाची चौकशी व्हावी...शिवाजी उद्यमनगर परिसरात शंभरहून अधिक कारखाने आहेत. त्यामानाने नागरी वस्तींचे प्रमाण कमी आहे. या कारखान्यांमुळे या परिसरात दिवस-रात्र अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. ही पाईपलाईन या अवजड वाहनांमुळे टिकणार नाही. त्यामुळे याठिकाणी उच्च दर्जाची पाईपलाईन वापरून एकंदरीत या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.तीन किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचे इस्टिमेटस्ट्रॉम वॉटरसाठी साडेचारशे मिलिमीटर पाईपतीनशे मिलिमीटर अंतर्गत वाहिनी पाईप (उदा. केबल वाहिन्यांसाठी)पाईपलाईनची तपासणी प्रयोगशाळांमधून कामाचा दर्जा तपासणारी स्वतंत्र यंत्रणा आहे का ? या तीन किलोमीटरसाठी टाकण्यात येत असलेल्या पाईपलाईनचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे का ? महापालिका प्रशासनाकडून त्यावर कोणाचे नियंत्रण आहे का ? अशा अनेक प्रश्नांची विचारणा नागरिकांमधून होऊ लागली आहे.३० वर्षांनंतर नवीन पार्ईपलाईन...या वसाहतीमध्ये ३० वर्षांपूर्वी अशा प्रकारची स्ट्रॉम वॉटरसाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर सध्या ही नवीन पाईपलाईन होत आहे. त्यामुळे ती चांगल्या दर्जाची व उच्च प्रतीची टाकण्यात यावी, अशी मागणी कारखानदारांमधून होत आहे.गटारींसाठी वापरण्यात येणाऱ्या पाईप या निकृष्ट आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मुळात गेल्या ३० वर्षांनंतर हे काम सुरू आहे. त्यामुळे हे काम दर्जेदार होणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिकेला गांभीर्य नाही.-बाबासोा कोंडेकर,आॅनररी सेक्रेटरी,इंजिनिअरिंग असो.‘प्रायमो’ या कंपनीकडे कन्सल्टंसीचे काम आहे. राजकीय हस्तक्षेप व ठेकेदारांतील हेव्या-दाव्यांमुळे अशा त्रुटी होत आहेत. मी काल, शनिवारी पदभार स्वीकारला आहे. याची तपासणी करण्यात येईल.- एस. के. माने, प्र. कार्यकारी अभियंता, महापालिका.
गटारीसाठी निकृष्ट पाईपचा वापर
By admin | Published: January 05, 2015 12:06 AM