खोची : ओल्ड बुलेटमध्ये अनेक बदल करून पूर्ण लूक बदलत तिचे लक्झरीअस क्रूझर बाइकमध्ये रूपांतर करण्याची किमया वाठार येथील अशोकराव माने पॉलिटेक्निकचा विद्यार्थी राजवर्धन दबडे यांनी केली आहे. स्पोर्ट्स बाइक असल्याने तिला पाहण्यासाठी व टेस्ट ड्राइव्हसाठी तरुणांची गर्दी होत आहे.
राजवर्धन दबडे ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या वर्गात शिकत आहे. पहिल्यापासून त्याला गाड्यांच्या दुरुस्तीची आवड आहे. कॉलेजमध्ये घेत असलेल्या ज्ञानाचा वापर करीत त्याने बुलेट मॉडीफाय करण्याचा निश्चय केला. त्यासाठी १९८२ मधील ३५० सीसीची जुनी बुलेट हातात घेतली. तीन महिन्यांत त्याने तिचे रूपच बदलले. इंजिनची क्षमता वाढवून ५०० सीसी केली.मोठा कार्बोरेटर घालून हाय गीअर बॉक्स बसविला. आरपीएमचा रेशीओ वाढविला.इंजिन हेड बदलले.बसण्याची व्यवस्था बदलून एकच सीट ठेवली. ग्रीप घेणारे मोठे टायर बसविले.तेलाच्या टाकीचा आकार चपटा करून क्षमता १७ लिटर केली.हेड लाइट एलईडी बसविला.अशा प्रकारे पूर्णतः बदल करून डबल फायरिंग असणारी बुलेट बनविली.
यासाठी प्राचार्य वाय. आर. गुरव,प्रा.पी.टी.हसबे यांचे मार्गदर्शन मिळाले.
०८ माने बुलेट क्रूझर
फोटो ओळी- वाठार येथील अशोकराव माने पॉलिटेक्निकचा विद्यार्थी राजवर्धन दबडे याने जुनी बुलेट मॉडीफाय केली. याबद्दल त्याचा सत्कार प्राचार्य वाय.आर. गुरव यांनी केला. यावेळी प्राध्यापक उपस्थित होते.