करंजफेण/कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून चव्हाणवाडी पैकी चिखलकरवाडी (ता.पन्हाळा) येथे बाप-लेकांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून चुलत भावाचा खून केला. सदाशिव महादेव नायकवडे (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे. या घटनेत शशिकला ऊर्फ आक्काताई सदाशिव नायकवडे याही गंभीर जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी हिंदुराव नायकवडे व शशिकांत हिंदुराव नायकवडे व विक्रम हिंदुराव नायकवडे यांच्याविरुद्ध पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चिखलकरवाडी येथे सदाशिव नायकवडे, हिंदुराव यशवंत नायकवडे यांची एकत्रित चार एकर जांभळीचे वावर नावाची जमीन आहे. या जमिनीबाबत या दोघा चूलत भावामध्ये वाद सुरु आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी जमिनीच्या कारणातून किरकोळ वादावादी झाली होती. रात्री पुन्हा दोन कुटुंबामध्ये जोरदार भांडण झाले. हिंदुराव नायकवडे याने सदाशिव नायकवडे यांच्या दारात जाऊन प्रथम हवेत गोळीबार केला. तर शशिकांत हिंदूराव नायकवडे याने कुºहाडीने दरवाजा तोडून घरात घूसून समोरासमोर गोळीबार केला. यामध्ये सदाशिव महादेव नायकवडे यांच्या पोटात गोळी लागली तर त्यांच्या पत्नी शशिकला उर्फ आक्काताई सदाशिव नायकवडे यांच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागून त्या जखमी झाल्या. गंभीरजखमी झालेल्या नायकवडे दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सदाशिव यांचा मृत्यू झाला.अमितला मानसिक धक्कागोळीबारात ठार झालेल्या सदाशिव नाईकवडे यांचा मुलगा अमित याला या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला. तो सीपीआर आवारात विषण्ण अवस्थेत बसून होता. त्याला सावरण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळींकडून धीर दिला जात होता. ‘क्षणात होत्याचं नव्हतं झालं,’ अशीच भावना नातेवाईक व मित्रमंडळींमधून व्यक्त केली जात होती.पोलीस अधीक्षकांची ‘सीपीआर’ला भेटचिखलकरवाडी (ता. पन्हाळा) येथे शेतीच्या वादातून झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या सदाशिव महादेव नायकवडे यांच्या नातेवाइकांची पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सीपीआर रुग्णालय येथे भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली. जखमी आक्काताई सदाशिव नायकवडे यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी नाईकवडे यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींचे अश्रू अनावर झाले.पोलीस अधीक्षकांची ‘सीपीआर’ला भेटचिखलकरवाडी (ता. पन्हाळा) येथे शेतीच्या वादातून झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या सदाशिव महादेव नायकवडे यांच्या नातेवाइकांची पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सीपीआर रुग्णालय येथे भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली. जखमी आक्काताई सदाशिव नायकवडे यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी नाईकवडे यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींचे अश्रू अनावर झाले.