शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साह द्विगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:31 AM

कोल्हापूर : भव्य आतषबाजी, तुतारीचा नाद, हलगीचा कडकडाट, बॉलिवूड डान्स, रांपा नृत्य, लाठी-काठी, पोलीस बँड, झांजपथक, लेझीम अशा विविधरंगी ...

कोल्हापूर : भव्य आतषबाजी, तुतारीचा नाद, हलगीचा कडकडाट, बॉलिवूड डान्स, रांपा नृत्य, लाठी-काठी, पोलीस बँड, झांजपथक, लेझीम अशा विविधरंगी आणि विविधढंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी सकाळच्या बोचणाऱ्या थंडीतही रविवारी आयोजित ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणाºया स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला.पोलीस परेड ग्राऊंडवर उडत्या चालीच्या संगीतावर अ‍ॅरोबिक्स स्टाईलने सुरू झालेल्या झुंबा डान्सने धावपटूंच्या वॉर्म अपला सुरुवात झाली आणि प्रत्येक रनच्या झालेल्या भव्य आतषबाजीने आकाशात इंद्रधनूचे रंग भरले. तुतारीचा निनाद, हलगीचा कडकडाट आणि वाकोबा झांजपथकाने सहभागींना धावण्यासाठी स्फुरण चढले.पितळी गणपती चौकात पेठवडगावच्या श्री दत्तगुरू प्रासादिक भजनी मंडळाने वातावरणात भक्तीचे सूर भरले; तर पुढे धैर्यप्रसाद हॉलच्या चौकात पोलीस बॅँडमुळे अभिमानाची ज्योत पेटविली. येथेच उडणाºया मशीन बलून्सने आणि मिकी माऊसने फन रनर असलेल्या बालचमूंपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच गमतीदार अनुभव दिला. येथेच डीआॅन इट डान्स अ‍ॅँड फिटनेस स्टुडिओ या ग्रुपमधील मुलींनी लाठीच्या तालावर आधारित रापा नृत्य सादर केले. सेवा रुग्णालय परिसरात प्रिन्स शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे झांजपथक सज्ज होते. गोल्ड जिम येथे अल्फान्सो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुरेख तालबद्ध बॅँडचा अनुभव दिला. हॉटेल सयाजी येथे श्रीधर सावंत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी झांजा वाजविल्या; तर केएसबीपी चौकात जिजाऊ बालमंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझीमसह विविध कसरती सादर केल्या. पुढे शिवाजी विद्यापीठात ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने धावपटूंचा शीण घालविला. शांतिनिकेतन येथे देशभक्त रत्नाप्पा कुंभार शाळेचे झांजपथक धावपटूंना चीअर अप करीत होते.पोलीस ग्राऊंडमधील मुख्य व्यासपीठावरही बक्षीस समारंभ होईपर्यंत सहस्रम बॅँडचे गायक विशाल सुतार व वैष्णवी गोरड यांनी बहारदार गीते सादर केली; तर चंद्रकांत पाटील यांच्या डीआॅन इट डान्स अ‍ॅँड फिटनेस ग्रुपने लोकनृत्य व बॉलिवूड नृत्याविष्काराने थिरकावले.