कोल्हापूर : पंधरा वर्षांच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीनंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे भाजपतर्फे कोण मुख्यमंत्री होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता आहे. ... तरीही पालकमंत्री पाटीलचकोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी दहा वर्षे कमांड सांभाळली. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण असे तीन मुख्यमंत्री झाले; पण हर्षवर्धन पाटील मात्र पालकमंत्री म्हणून कायम राहिले. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारदरबारी राजकीय वजन वापरून निधी आणला. पण, शाहू जन्मभूमी विकास, चित्रनगरी, शाहू स्मारक आराखडा, गारमेंट पार्क, पंचगंगा प्रदूषण रोखण्याची उपाययोजना अशी महत्त्वाची कामे रेंगाळली आहेत. पालकमंत्री नव्हे पर्यटनमंत्री हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूरला ते वेळ देत नाहीत, जनतेला भेटत नाहीत अशा तक्रारी सुरू झाल्या. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी आणि जिल्हा नियोजनाची बैठक यासाठीच ते कोल्हापुरात येत राहिले. टोलविरोधात लढणाऱ्या आंदोलकांची तर त्यांनी अवहेलनाच केली. त्यामुळे ‘पालकमंत्री नव्हे पर्यटनमंत्री’ अशा शब्दांत त्यांची तुलना करण्यात आली.राजकारणातही ढवळाढवळ पाटील हे देशमुख गटाचे. त्यामुळे पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात असताना सतेज पाटील यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. याउलट त्यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना जुळवून घेतले होते. त्यामुळे काँग्रेसचे असूनही गटतटाचा विचार होत गेला. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. दोन कदमांच्या दोन तऱ्हाहर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरला म्हणावा तेवढा वेळ दिला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या आधी पालकमंत्री म्हणून पतंगराव कदम (काँग्रेस), रामदास कदम ( शिवसेना) यांनीही काम केले. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी होती. पतंगराव कदम हे वडीलकीच्या नात्याने बोलून काम करून घेत होते, तर रामदास कदम तर रोखठोक बोलत होते. त्यांच्या बोलण्यात ‘दम’ असायचा.भेटणारा पालकमंत्री हवा राज्यात भाजप व शिवसेना यांचेच सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापुरातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर भाजपतर्फे सुरेश हाळवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे नव्या मंत्र्यांच्या यादीत चर्चेत आहेत. त्यामुळे पालकमंत्री यापैकीच एक होणार की, अन्य कोणी येणार याबाबत राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते, अधिकारी यांच्यात उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता लवकर संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
पालकमंत्र्यांबाबत उत्सुकता
By admin | Published: October 23, 2014 12:30 AM