कोल्हापूर : स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक असून, त्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अचानक धाडी टाकण्याची मोहीम तीव्र करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय ‘पीसीपीएनडीटी’ दक्षता पथक समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूक देसाई, ‘पीसीपीएनडीटी’ कायदा सल्लागार गौरी पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास देशमुख, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कदम, आदी प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील १ हजार मुलांच्या जन्माच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण ९३३ आहे. हे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या १५० सोनोग्राफी सेंटर्समध्ये १३२ अल्ट्रासोनोग्राफी सेंटर्स, १० कार्डीआॅलॉजिस्ट सेंटर्स, ६ सर्जिकल सेंटर्स आणि २ एमआरआय सेंटर्सचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून ‘पीसीपीएनडीटी’ अॅक्टनुसार कार्यवाही होणे बंधनकारक असून, यामध्ये हयगय करणाऱ्या सेंटर्सवर तत्काळ कार्यवाही करावी....अन्‘स्त्रीभ्रूण’ हत्या टाळास्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे समजल्यास 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर, तसेच नजीकच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधावा. माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे केम्पी पाटील यांनी सांगितले.
‘नोंदणीकृत’ केंद्रांवरही नजर ठेवाजिल्ह्यात १५३ नोंदणीकृत वैद्यकीय गर्भपात केंद्रे असून यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राकडील ७२, ग्रामीण रुग्णालयांची २०, तर ६१ खासगी वैद्यकीय गर्भपात केंद्रांचा समावेश आहे. या केंद्राच्या कामकाजावरही करडी नजर ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित ‘पीसीपीएनडीटी’ दक्षता पथक समिती बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.