शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

सायबर दरोड्याने बॅँका धास्तावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 11:13 PM

शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद करून चोरट्यांनी पाच लाख रुपये काढले. प्रॉकसी स्वीच तयार करून कॉसमॉस बॅँकेला हॅकरनी ९४ कोटींना लुटले. एटीएम पिन विचारून फसवणूक होण्याचे प्रकार आता सर्रास

रमेश पाटील ।कोल्हापूर : शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद करून चोरट्यांनी पाच लाख रुपये काढले. प्रॉकसी स्वीच तयार करून कॉसमॉस बॅँकेला हॅकरनी ९४ कोटींना लुटले. एटीएम पिन विचारून फसवणूक होण्याचे प्रकार आता सर्रास होत आहेत. एटीएमवर अशा अधूनमधून पडणाऱ्या सायबर दरोड्याने बॅँका आता धास्तावल्या आहेत. बॅँकांच्या आयटी विभागाच्या पुढे या सायबर गुन्हेगारांचे ‘डोके’ चालते एवढीच प्रतिक्रिया बॅँक वर्तुळातून दिली जात आहे.

कॉसमॉस बॅँकेवर ११ व १३ आॅगस्टला सायबर दरोडा पडला. कॅनडासह २८ देशांतून केवळ दोन तासांत ७८ कोटी काढले गेले. त्याचवेळी देशांतील विविध शहरांमधील १३ आॅगस्टला १३ कोटी ९२ लाख रुपये हॅकरनी इतर खात्यावर वळविले. या घटनेला पंधरा-तीन आठवडे होतात तोपर्यंत कोल्हापुरात हॅकरनी नवीन युक्ती वापरून स्टेट बॅँकेच्या एटीएममधून मशीनचा स्वीच पॉवर बंद करून पाच लाख १० हजार रुपये काढले.

याबाबत कोल्हापुरातील एका राष्टÑीयीकृत बॅँकेच्या आयटी विभागातील अधिकारी यांनी काही सूचना केल्या. सूचनेनुसार को-आॅप. बॅँका, शेड्युल्ड दर्जाच्या बॅँकांबरोबरच राष्टÑीयीकृत बॅँकांनी इंटरनॅशनल ट्रॅँझॅक्शन ही सध्या सुरू असलेली सुविधा बंद करून, ग्राहकाने अशी सुविधा मागितली तरच त्याला ही सुविधा पुरवावी. इतरांसाठी मात्र ही सुविधा बंद ठेवावी. तसेच काही बनावट वेबसाईटवरून बॅँकेचे व्यवहार होतात. त्यामुळे बॅँकांनी दर आठवड्याला सिक्युरिटी सर्चमधून अपडेट घ्यावा. त्यामुळे बनावट वेबसाईट ओळखता येतील. एटीएमचा पिनकोड कोणाला सांगू नये, अथवा कोठेही लिहून ठेवू नये. बॅँका ग्राहकांना फोनवरून एटीएमची माहिती विचारत नाहीत. तसेच एटीएमचा पिन टाकत असताना एक हात पिनच्या वरती आडवा धरावा. जेणेकरून आपण पिन काय दिला हे इतरांना समजू नये. या सूचना ग्राहकांनी अमलात आणल्यास सायबर गुन्ह्याला काही प्रमाणात आळा बसेल, असे अधिकाºयांचे मत आहे.

बॅँकांनी एटीएम देखभाल खर्च परवडत नसल्यामुळे सिक्युरिटी गार्ड (सुरक्षा रक्षक) ठेवण्याचे बंद केले आहे. चोरट्यांनी जर एटीएम फोडले तर विमा कंपनी नुकसानभरपाई देते. या मानसिकतेने काही बॅँकांनी सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. एकंदरीत संगणक तज्ज्ञ असणारे सायबर गुन्हेगार बॅँकांच्या पुढे आहेत. प्रत्येकवेळी नवनवीन युक्त्या वापरून सायबर दरोडा टाकला जातो. त्यामुळे सर्वांनीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे.संगणक तज्ज्ञ असणारे सायबर गुन्हेगार बॅँकांच्या पुढे आहेत.बॅँकांबरोबरच आता ग्राहकांनाही आॅनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकMONEYपैसाfraudधोकेबाजी