शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

दुर्गम विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम-जीवनधारा ब्लड बॅँकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:16 AM

शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देशाहूवाडी, गगनबावडा, राधानगरीतील ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम हाती घेतला आहे. जुन्या वापरलेल्या सायकली घेऊन, त्याची दुरुस्ती करून त्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार असून, यामध्ये किमान ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

शहरात तंत्रज्ञानाचा वापर, वाहतुकीच्या सहज सुविधा, वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाते. शहरे व सधन तालुक्यात विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये घेऊन जाण्यासाठी बसेस थेट दारात येतात; पण याउलट दुर्गम, वाड्या वस्त्यांवरील चित्र आहे. विशेषत: शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी परिसरातील दुर्गम खेड्यापाड्यातील मुलामुलींनी ४- ५ किलोमीटर पायपीट करावी लागते. जिथे वाहतुकीची व्यवस्था, तिथे तासन्तास वाहनांची वाट पाहत उभे राहावे लागते. जिथे सुविधाच नाहीत तिथे पायपीट करत ये-जा करावी लागते. पावसाळ्यात तर जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मदत करण्याची भूमिका जीवनधारा ब्लड बॅँकेचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. यामध्ये उमेद फौंडेशन, सांगरूळ, तसेच फ्रेंडस अकॅडमी, कोल्हापूरचे कार्यकर्तेही सक्रिय होत आहेत.सधन कुटुंबातील मुलांना लहानपणापासूनच सायकलीचे लाड पुरविले जातात. मुले जशी मोठी होत जातील, तशा या सायकली बदलत जाऊन, अडगळीत पडल्या जातात. या सायकली घ्यायची, त्याची दुरुस्ती करून त्या गरजू विद्यार्थ्यांना देण्याची संकल्पना प्रकाश घुंगूरकर यांनी मांडली. वापर नसलेल्या, मोडकळीस आलेल्या सायकली या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन घुंगूरकर यांनी केले आहे. या सायकली दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांना वापरासाठी देण्यात येणार आहेत.

संबंधित विद्यार्थ्यांची गरज संपल्यानंतर ही सायकल परत करायची आणि ती दुरुस्त करून पुन्हा गरजू विद्यार्थ्यांना वापरासाठी देण्यात येणार आहे. अशाप्रकारे सायकल रिसायकलचे चक्र सुरू ठेवण्याचा मानस प्रकाश घुंगूरकर यांनी केला आहे. त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून, ही चळवळ व्यापक करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याच्या प्रयत्नाचे समाजातून कौतुक होत आहे.मुंबईतून १५ सायकली जमाया उपक्रमात सहभागी होण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहेच; त्याशिवाय मुंबईतील पंधराहून अधिक पालकांनी सायकली देण्याची तयारी दर्शवली आहे.या भागातून होते  सायकलची मागणीअनुस्कुरा, बर्की, वाकीचा धनगरवाडा, गवशी, गावठाण, धुंदवडे, गगनबावडा. 

ब्लड बॅँकेच्या कॅम्पसाठी शाहूवाडी तालुक्यात गेल्यानंतर विद्यार्थ्यांची पायपीट पाहिली. त्यातून ही संकल्पना सूचली असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्रकाश घुंगूरकर, अध्यक्ष, जीवनधारा ब्लड बॅँक

टॅग्स :social workerसमाजसेवकkolhapurकोल्हापूर