शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

वय वर्ष अवघे दहा; ३ हजार ६०० किलोमीटरचा करणार प्रवास, का करत आहे इतका प्रवास जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 6:39 PM

कमी वयात सामाजिक बांधीलकी जपत इतक्या लांबचा प्रवास करण्याची सईची जिद्द पाहून अनेकजण भारावून जात आहेत.

कोल्हापूर : काश्मीर येथून आव्हानात्मक प्रवास करत ठाण्याची सई आशिष पाटील ही दहा वर्षाची सायकलपटू गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचली. करवीरनगरीत शिवराष्ट्र हायकर्स आणि मदत फाउंडेशनतर्फे तिचे जंगी स्वागत करण्यात आले. येथून शुक्रवारी दुपारी बारा वाजता ती कन्याकुमारीकडे रवाना झाली. ‘सेव्ह गर्ल, टिच गर्ल, सेव्ह नेचर’ असा संदेश देत प्रबोधन करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा सुमारे ३ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करून ती विश्वविक्रम नोंदविणार आहे.करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनानंतर सकाळी अकरा वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते सईचा सत्कार झाला. त्यांनी सईला शुभेच्छा दिल्या. खासदार संभाजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सईचा सत्कार झाला. यावेळी मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन पाटील, डॉ. संदीप पाटील, शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, मोहन खोत, सायकल असोसिएशनचे अरुण सावंत, नीलेश साळोखे, साधना साळोखे, विनायक जरांडे, पवन पाटील, आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील महाराणी ताराराणी पुतळा येथून सईला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पुढील दोन हजार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ती दुपारी बारा वाजता कन्याकुमारीकडे रवाना झाली. या सायकल मोहिमेत सईचे वडील आशिष, आई विद्या, साई पाटील, अक्षय पाटील, सुमित कोटकर, राज भोईर, बाबू भोईर, राजेश पाटील, अक्षय पाटील सहभागी आहेत.अनेकजण भारावलेमुलगी आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देशाला देण्यासाठी मी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करत आहे. मला पुढे नौदल करिअर करून देशसेवा करायची असल्याचे सई हिने सांगितले. कमी वयात सामाजिक बांधीलकी जपत इतक्या लांबचा प्रवास करण्याची सईची जिद्द पाहून अनेकजण भारावून जात आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर