शिरगाव : मुसळवाडी ता. राधानगरी येथील एका घरामध्ये चुलीतील असणारा विस्तव व जवळच असलेला सिलिंडरचा झालेल्या स्फोटात बाजूच्या दोन घरानांही आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आगीत जवळपास तिन्ही घरांचे वीस लाखांचे नुकसान झाले. भोगावती कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.याबाबत माहिती अशी की, येथील श्रीमती लक्ष्मी लगडे या चुलीवर स्वयंपाक करून शेताकडे गेल्या होत्या. त्या वेळी चुलींमध्ये विस्तव असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटात घरात असणारे साहित्य बघता बघता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शेजारच्या दोन घरांनाही या आगीच्या ज्वाळा पसरल्याने त्या दोन घरानांही आग लागली. त्यामुळे या दोन्ही घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.आगीत संसारपयोगी साहित्यासह रोख रक्कम जळून खाक झाली. तर शेजारच्या रघुनाथ लकडे व रवींद्र लकडे यांच्या घराचे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले. पोलिस पाटील सचिन महाडिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी पंचनामा केला. या दुर्घटनेची माहिती मिळताच भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा.ए.डी.चौगले, माजी सभापती संजयसिंह कलिकते, माजी उपसभापती व शिरगाव चे सरपंच संदीप पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील यांनी भेट देऊन लकडे कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान या आगीमुळे लकडे कुटुंबियांना धक्का बसला असून अनेकांनी त्यांना धीर दिला.
Kolhapur: सिलिंडरच्या स्फोटात दोन घरांना आग, लाखोचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 3:47 PM