कसबा बावडा : जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सोमवारी महिलांसाठी विशेष तपासणी योजना राबवली जाणार आहे. स्त्रीरोग विभागाच्यावतीने महिलांसाठी चार तपासण्या विनाशुल्क केल्या जाणार आहेत.
या मोफत तपासणीमध्ये पॅप स्मियर (गर्भाशय मुखाची तपासणी), कोल्पोस्कोपी (गर्भाशय पिशवीची दुर्बिणीद्वारे तपासणी), स्तन परीक्षण व प्रसूतीपूर्व तपासणीचा समावेश आहे.
या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी केली आहे.
त्याचबरोबर 'फेलिसिएटिंग द वूमनहूड ' या विशेष कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. कोविड महामारीच्या काळात वैद्यकीय सेवेत विशेष योगदान देणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.