शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

डी. वाय. पाटील ग्रुप शेती क्षेत्रात क्रांती करणारी पिढी घडवेल -शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:17 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विज्ञानावर आधारित शेती विकासाचा पाया रचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विज्ञानावर आधारित शेती विकासाचा पाया रचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता त्याच कोल्हापुरात डी. वाय. पाटील ग्रुपचे खासगी क्षेत्रातील राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले, याचा सार्थ अभिमान आहे, हे विद्यापीठ शेती क्षेत्रात क्रांती घडवणारी नवीन पिढी तयार करेल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ऑनलाइन उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते. डी. वाय. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री विश्वजित कदम व प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. ऋतुराज पाटील, राजू आवळे, आ. जयंत आसगावकर, खा. संजय मंडलिक, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, हे मान्यवर सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेेळी विद्यापीठाचे उद्घाटन, शैक्षणिक संकूल इमारत कोनशिला, मुक्त गाेठा प्रकल्प, मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले.

राज्यातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनीच कोल्हापूरच्या मातीत विद्यापीठाचा शुभारंभ होण्याचा योग जुळून आला ही आनंददायी गोष्ट असल्याची भावना व्यक्त करून शरद पवार म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत बदल अनुभवायचा असल्यास शेतीचे अर्थकारण सुधारण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीवर अवलंबून असणाऱ्या ५८ टक्के लोकांची क्रयशक्ती सुधारली नाही तर देश संकटातून बाहेर येणार नाही, हे वास्तव आहे. चीन, बँकॉक, नेदरलॅण्डसारख्या शेतीक्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांशी समन्वय साधा, काही अडचण आली तर मला सांगा मी मदत करेन, अशी ग्वाहीदेखील दिली. राज्यातील राहुरी, परभणी, अकोला, दापोली येथील चारही सरकारी कृषी विद्यापीठाने आतापर्यंत महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. आता एकत्रित विद्यापीठ ही संकल्पना घेऊन डी. वाय. पाटील ग्रुपने यात पाऊल ठेवले आहे, हे स्तुत्य आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करा.

-----------------------------

ए ग्रेडचे विद्यापीठ करू...

कृषी विद्यापीठ ही डी. वाय. ग्रुपची सातवी शाखा आहे. इतर संस्थांप्रमाणेच १६ हजार विद्यार्थी संख्या, नॅकचे ए ग्रेड मानांकन आणि आयसीआयची मान्यता मिळवणे हे आपले येथू्न पुढे ध्येय असणार आहे आणि त्यात नक्कीच यशदेखील येईल, असा विश्वास संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

-----------------------------

संशोधनावर भर द्या

विद्यापीठात संशोधनावर भर देण्यास सांगताना पवार म्हणाले, उत्पादन वाढीसाठी बियाणांत नवनवीन संशोधन काळाची गरज आहे. अमेरिका, ब्राझीलसारख्या देशांत जीएम वाणावर एका बाजूला चळवळी होतात, तर दुसरीकडे त्याच बियाणांद्वारे उत्पादन वाढवून जगभर निर्यातही करतात. भारतात देखील हेच धोरण हवे. देशात संशोधन करणाऱ्या ८० संस्थांमध्ये पाच हजार शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे संंशोधन बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.

-----------------------------

पवार आणि पंतप्रधान

शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाला पंतप्रधानपदी बसलेले मला पाहायचे आहे. ते स्वप्न पूर्ण होऊ दे, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे, असा पुनरुच्चार माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी केला.

-----------------------------

फाेेटो : ०१ कोल्हापूर ०३

कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डाॅ. डी.वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ऑनलाइन उद्घाटन गुरुवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते व माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डावीकडून खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, डॉ. संजय डी. पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व आ. राजूबाबा आवळे उपस्थित होते.