मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील व रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या पद्धतीसाठी २०१८ साली संशोधकांनी पेटंट मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता. विविध चाचण्यामधून आणि २ वर्षांच्या सातत्यपूर्वक प्रयत्नांती हे पेटंट २१ जून २०२१ रोजी संशोधकांच्या नावे मंजूर करण्यात आले आहे. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीण्यपूर्वक शोधपद्धती पुढील २० वर्षांसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.
यासंदर्भात संस्थेचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले म्हणाले की, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत निर्गमित झालेले हे पहिले मान्यताप्राप्त पेटंट आहे. विद्यापीठ व संशोधकांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत आनंददायी आहे.
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांच्यासमवेत रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, रजिस्ट्रार डॉ. वि. वि. भोसले तसेच संशोधक विद्यार्थी प्रणव काटकर आणि सुप्रिया मरजे यांचा सहभाग होता.
फोटो : ०२ डीवायपी पेटंट
ओळी:
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नवे पेटंट मिळवणाऱ्या डॉ. उमाकांत पाटील, डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अभिनंदन करताना प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, समवेत डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. एफ. पाटील.