- प्रकाश कदम
पोलादपूर: दिनांक 22 व 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये देवळेग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावातील घरे दरडीखाली येवून पाच जण मृत्युमुखी पडले तर अंबेमाची या गावातील 87 ग्रामस्थांना रेस्क्यू ऑपरेशन करून नानेघोल येथे सुरक्षित स्थळी हलवावे लागले. अतिवृष्टिमुळे या गावाबरोबरच दाभिळ व हलदुले च्यावरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दरडी आल्या असून सुदैवाने दोन्ही गाव बचावले आहेत.
महाबळेश्वर प्रतापगड परिसरामध्ये 548 मि मि पाऊस झाल्याने या सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात ओहल मधे पाण्याचा लोट आल्याने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले.त्यामुळे आंबेनळी महाबळेश्वरच्या खालील भागामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी आल्या त्यामध्ये दाभिळ व हलदुले या गावाच्या वरच्या बाजूने गावच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या त्यामुळे दाभिळ गावचा संपर्क तुटलेला आहे. गाव बचावले आहे गावच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून गावाच्या खालच्या बाजूला असलेल्या पाच घरांना धोका निर्माण झाला आहे तसेच दाभिळ आदिवासी वाडीच्या वरच्या बाजूला दरड कोसळल्याने या घरांना धोका निर्माण झाला आहे.
यामधील दहा ते बारा कुटुंबांना ताबडतोब स्थलांतरित करणे गरजेचे आहे लहू लशे कडील साकव वाहून गेल्याने त्यांचा त्या बाजूचा ही संपर्क तुटलेला आहे आत्ता हलदुले बाजूला त्यांना पायी येण्यासाठी आलेल्या दरडी मधूनच आपला जीव मुठीत घेऊन यावे लागत आहे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन ह्या गावा बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी महादेव कोळी समाजाचे तालुकाध्यक्ष शांताराम शेलार यांनी मागणी केली आहे.
सोळा आदिवासी कुटुंबे धोकादायक स्थितीत आहेत त्यातील आठ कुटुंबे येथे वास्तव्याला असून बाकी कुटुंब बाहेरगावी आहेत ह्या जलप्रलयात विहिरी ,पाण्याचे तलाव साकव, रस्ते वाहून गेल्याने दुर्गम भागातील लहुल से करंजे आदिवासीवाडी, दाभिळ हलदुळे या गावांचा संपर्कच तुटला आहे तेथे मदत पोहोचणे अवघड झालेले आहे देवळे ग्रामपंचायत येथील स्थानिक कार्यकर्ते अनिल दळवी रवी केसरकर किसन रिंगे उपसरपंच शंकर केसरकर तुकाराम पवार पांडुरंग मोरे , आनंद केसरकर ,माजी सरपंच प्रकाश कदम हे पायपीट करून कशीतरी या गावाला पोहोचले त्यावेळी तेथील भीषण वास्तविकता समोर आले. दरम्यान प्रांत अधिकारी प्रतिमा पुदळवाड यांनी या गावची अडचण लक्षात घेवून तातडीने मंडळ अधिकारी अजय जाधव तलाठी वैराले यांच्यासमवेत भूगर्भ तज्ञांना दाभिल येथे पाठवण्यात आले आहे