कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासाबाबत हे सरकार गंभीर नाही. ज्या गतीने तपास व्हायला पाहीजे, त्या पध्दतीने तपास होत नाही, असा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे केला.डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांच्यासह पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समाधानकारक तपास होत नसल्याच्या निषेधार्थ अंधश्रध्दा निर्मुलन समिती व समविचारी पक्ष, संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जवाब दो’आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. यानंतर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे असे सांगण्यात आले.एन.डी. पाटील म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु त्यांच्या हत्येप्रकरणी आम्ही आमच्या परीने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या नाकर्ते सरकारने आतापर्यंत रडतराऊतचीच भूमिका घेतली आहे. दाभोलकरांसह पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासामध्ये नेमेलल्या सीबीआयसह अन्य पोलिस यंत्रणांकडून समाधानकारक पावले उचलल्याचे दिसत नाही.ते पुढे म्हणाले, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासात आतापर्यंत पाच अधिकारी बदलले आहेत. त्यामुळे तपासात गती आलेली नाही. याकरीता स्वतंत्र अधिकाऱ्याचे पथक या तपासासाठी नेमण्याची गरज असून ते नेमावे. या प्रकरणी सरकार योग्य दिशेने तपास करत असल्याची ग्वाही कृतीतून मिळाली पाहीजे. परंतु सरकारला याबाबत आश्वासक चित्र मांडता आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमत्र्यांशी याबाबत चर्चा करावी.आंदोलनात कृष्णात कोरे, दिलीप पवार, डॉ. टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, सतीशचंद्र कांबळे, रमेश वडणगेकर, रवी जाधव, अरुण पाटील, नियाज अत्तार, सीमा पाटील, स्रेहल कांबळे, स्वाती कृष्णात, बी. एल. बरगे, अनुप्रिया कदम आदी सहभागी झाले होते.
सनातन,हिंदू जनजागरणवर रोखदाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या खुनांच्या मालीकांमागे षडयंत्र आखून नियोजनबध्द कार्यवाही करायला प्रवृत्त करणारे सुत्रधार म्हणून सनातन संस्था व हिंदू जनगागरण समितीच्या साधकांचा सहभाग असल्याचे आरोपपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. असे असूनही तपासात दिरंगाई होत असल्याचो आरोप ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
औषधांचा वापर गुन्हेगारी वाढविण्यासाठीपनवेलच्या आश्रमात पोलिसांनी छापे टाकून औषधे जप्त केली होती. या औषधांचा वापर गुन्हेगारी वाढविण्यासाठी होतोय हे भयानक आहे. त्यावर ड्रग्स अॅक्टखाली कारवाई करता येऊ शकते, परंतु सरकार हे काम करत नाही, असा आरोप एन.डी. पाटील यांनी केला.