शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

बापरे! वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दहा कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:26 AM

कोल्हापूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या दोन वर्षांत ई-चलनच्या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपयांचा दंड ...

कोल्हापूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या दोन वर्षांत ई-चलनच्या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातील आतापर्यंत ३ कोटी ९४ लाख वसूल झाले आहेत. गेल्या दहा दिवसांत विशेष मोहिमेत तब्बल १८०२ वाहनधारकांकडून ४ लाख ९२ हजार ८०० इतका दंड वसूल केला. दंड आकारण्याची कारवाई चार लाख वाहनधारकांवर करण्यात आली. त्याचा प्रतिदिन विचार करता रोज ५४७ लोकांना या दंडाचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात २८ मे २०१९ पासून ‘एक राज्य, एक ई-चलन’ प्रणाली सुरू झाली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर ई-चलन प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येते. पूर्वी वाहतूक शाखेचे पोलीसच दंडाची पावती फाडायचे, त्यातून गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी झाल्यावर त्याऐवजी सरकारने ई-चलनची व्यवस्था केली. गेल्या दोन वर्षांमध्ये ई-चलनने केलेली दंडात्मक कारवाईची रक्कम बहुतांश वाहनधारकांनी जमा केलेली नाही. त्यामुळे पेंडिंग रक्कम वसूल करण्याची विशेष मोहीम शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरू केली आहे.

चौकट

असा मोडला जातो नियम..

वाहन चालविताना मोबाइलचा वापर.

मद्यपान करून वाहन चालविणे.

अमलीपदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे.

सिंग्नल जंप करणे.

मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक

ओव्हरलोड वाहतूक

जास्त वेगाने वाहन चालविणे

चौकट

शहरातील दोन लाख वाहनधारकांना दंड

तीन वर्षांत शहरातील बेशिस्त वाहन चालविणाऱ्या २ लाख ३ हजार २४३ वाहनधारकांचे ई-चलन केले आहे. त्यापैकी ९८ हजार ३१६ जणांनी दंड जमा केला. १ लाख ४ हजार ९२७ जणांचा दंड भरणे बाकी आहे. आतापर्यंत २ कोटी १३ लाख ९१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल झाला असून, २ कोटी ३९ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल बाकी आहे.

चौकट

दृष्टिक्षेपात कारवाई....

ई-चलन कारवाई झालेली वाहने : ४ लाख ६ हजार १८२

दंड जमा केलेली वाहने : १ लाख ७३ हजार ९३०

दंड न जमा केलेली वाहने : २ लाख ३१ हजार ६०६

दाेन वर्षांतील दंड वसुली : ३ कोटी ९४ लाख ६३ हजार ३००

आजअखेर दंड थकीत : ६ कोटी ९ लाख १८ हजार ८००

चौकट

जुने वाहन खरेदी करताय ‘सावधान’

ई-चलनच्या माध्यमातून संबंधित वाहनांवर दंड पेंडिंग राहतो. त्यामुळे जुने वाहन खरेदी करताना वाहनधारकाने ई-चलन तपासणी करून घ्यावे लागणार आहे; अन्यथा मूळ मालकाचाही दंड भरावा लागतो.

दुसऱ्याला वाहन देऊ नकाच

स्वत:चे वाहन दुसऱ्याला देणेही आता धोक्याचे ठरत आहे. संबंधिताने वाहतुकीचे नियम भंग केल्यास मूळ मालकाच्या नावे ई-चलन होते.

१४ हजारांचा दंड भरला

नागाळा पार्कातील एकाने मुंबईतून चारचाकी खरेदी केली. त्यांनी ई-चलनबाबत माहिती घेतली असता १२ हजारांचा मूळ मालकाचा आणि स्वत:चा २ हजार ४०० इतका दंड झाल्याचे आढळून आले. त्याने स्वत:हून मंगळवारी दंडाची रक्कम जमा केली. प्रामाणिकपणे दंड जमा केल्याबद्दल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी त्यांचा सत्कारही केला.