शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Kolhapur: धोकादायक दरडींच्या भागांची रोज पाहणी करा, जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:02 PM

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये व भागामध्ये अतिवृष्टी, भूस्खलनाचा, दरडी कोसळण्याचा धोका आहे अशा गावांची महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रोज पाहणी करावी, एखाद्या ठिकाणी धोका वाटला तर तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कळवा, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना गुरुवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी अतिवृष्टी, दरडी कोसळणे, भूस्खलनाचा धोका व तत्पूर्वी प्रशासकीय पातळीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांची माहिती दिली.जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ज्या भागांमध्ये अतिवृष्टी होते. भूस्खलन व दरडी कोसळण्याचा धोका आहे त्या भागांची स्थानिक प्रशासनाच्या वतीने रोज पाहणी करण्यात यावी. या पाहणीदरम्यान एखाद्या ठिकाणी जमिनीची भेग वाढली आहे. वाहत्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग दिसत आहेत, जलाशयांना मोठी गळती जाणवत असेल किंवा एखाद्या भागात मातीचे ढिगारे साचत आहे, लहान-मोठे दगड पडत आहेत, असे दिसल्यास त्याची माहिती तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कळवा, अशी ठिकाणे मानवी वस्तीपासून जवळ असतील तर बाधीत होऊ शकणाऱ्या कुटुंबांचे कोठे स्थलांतर करायचे त्या जागा आधीच निश्चित करून ठेवा.

धोकादायक ठिकाणी असलेली मानवी वस्तीकरवीर : शिपेकरवाडीपन्हाळा : मराठवाडी, आपटीराधानगरी : म्हासुर्ली-खुपलेवाडी, पाटपन्हाळा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलनcollectorजिल्हाधिकारी