सरदार चौगुले -- पोर्ले तर्फ ठाणे --सरकारने ५०० व १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा परिणाम दूध क्षेत्रात प्रकर्षाने दिसून येत आहे. रोखीने दहा दिवसाने हमखास मिळणारे दूध बिल वाटप करणे अडचणीचे झाले. याला पर्याय म्हणून जिल्हा दूध संघाने दूध बिलाची रक्कम सोयीच्या बँक खात्यावर जमा करावी, असा आदेश गोकुळ संघाने जिल्ह्यातील दूध संस्थांना दिला आहे. या आदेशामुळे डेअरीत दूध भरण्यासाठी, तर दुधाचे बिल घेण्यासाठी बँकेच्या रांगेत दूध उत्पादकांना उभे राहावे लागणार आहे.शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या दूध संस्थेत रोखीने बिल घेणारे दूध उत्पादक ‘आम्हाला दूध संस्थेत बिल मिळाले पाहिजे’, असा हट्ट दूध संस्थांकडे करत आहेत. त्यामुळे संघाचा आदेश पाळायचा की सभासदांची मर्जी कशी सांभाळायची, यासाठी दूध संस्थेतील पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. आर्थिक साठमारीत काही संस्थांनी स्थानिक दूध विक्रीतून बिलाची कशीबशी रक्कम देऊन दूध स्पर्धेत वेगळा ठसा उमटविला आहे.दहा दिवसांचे दूध बिल देण्यासाठी संस्थांना लाखो रुपयांची रोकड लागते. नोटा रद्दच्या प्रक्रियेमुळे दहा दिवसाला बिल वाटप करणे सोयीचे व्हावे म्हणून दूध संघाने दूध उत्पादक आर्थिक अडचणीत येऊ नये म्हणून संलग्न संस्थांनी सोयीच्या बँकेत दूध बिलाच्या याद्या देऊन त्यांच्या खात्यावर बिल जमा करावे, असा आदेश काढला आहे; परंतु बहुतांश संस्थेत महिलांची सभासद संख्या जास्त आहे आणि त्यांचं बँकेत असेलच असे नाही. त्यामुळे कुटुंबातील कोणाच्यातरी खात्यावर बिलाची रक्कम वर्ग केली तर ती त्वरित सर्व मिळेल याची खात्री नाही. बँकेत तर सुट्ट्या रकमेचे वांदे असल्याने दोन हजाराची नोटच खातेदारांच्या हातात मिळते. एक तर ती नोट स्वीकारावी लागेल अथवा दोन हजार बिलाचा आकडा पार होईपर्यंत उत्पादकांना वाट पाहावी लागेल. त्यामुळे या वेळकाढू प्रक्रियेऐवजी दूध बिल संस्थेत रोखीने देण्यासाठी दूध संघाने व संस्थांनी प्रयत्न करावा, अशी मागणी दूध उत्पादकांतून होत आहे.दूृध उत्पादकांना दर दहा दिवसाला रोखीने मिळणारे बिल बँकेत वीस दिवसांनी मिळणार आहे. ती रक्कम त्याच्या प्रांपचिक खर्चाला वेळेत उपयोगी पडणारी नाही. बँकेतील बिल काढण्या प्रक्रिया त्रासांची आणि वेळकाढूपणाची आहे. त्यामुळे सरकारने व बँकेने रोकड उपलब्ध करून दूृध उत्पादकांना रोखीने बिल देण्यासाठी मदत करावी.-सदाशिव साळोखे , अध्यक्ष उदय दूृध संस्था (पोर्ले/ठाणे)दूध उत्पादकांच्या बिलातून कपात झालेल्या रुपयाच्या रकमेसाठीसुद्धा बँकेच्या रांगेत तासन्तास उभे राहावे लागणार आहे. बिलावर महिलांचा हक्क असल्याने बँकेची रांग त्यांच्यासाठी त्रासदायक आहे. आम्हाला दूृध संस्थेत रोखीने दहा दिवसाला बिल देण्याची सोय संबंधितांनी करावी. -राजेंद्र शिंदे, दूध उत्पादक (आसुलदूध उत्पादकांच्या बिल व खातेदारांच्या याद्या बँकेत जमा कराव्या लागणार महिला सभासदांचे बँक खाते आहे की नाही त्याची चौकशी करावी लागणारसंघाने खासगी विक्रीला बंदी घातल्याने खासगी दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून काहीअंशी बिले देता आली असती. दूध पुरवठा कमी होणार आहे.
दुधासाठी डेअरीमध्ये, बिलासाठी बँकेत रांग
By admin | Published: November 19, 2016 12:01 AM