बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या रकमेतून दरवर्षी आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी एका संशोधकाची फेलो म्हणून निवड केली जाते. यंदा या फेलोशिपसाठी डॉ. प्रभू यांची निवड झाली. त्यांनी फ्रान्समध्ये ग्रेनोबल येथे औषधांना दाद न देणाऱ्या आणि मेंदू शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या फिट्स यावर डी.बी.एस. या नावीन्यपूर्ण उपचार पद्धतीबाबत सहा वर्षे संशोधन केले. यासाठी त्यांना फेडरेशन ऑफ युरोपियन न्यूरो सायन्स सोसायटीजची वैयक्तिक ग्रँट मिळाली. फेलोशिपसाठी निवड झाल्याबद्दल डॉ. सुबोध प्रभू यांचा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा सत्कार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
‘बिहेविअरल इकॉनॉमिक्स’चे सल्लागार
भारतात परतल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी ‘बिहेविअरल इकॉनॉमिक्स’ विषयाचे सल्लागार म्हणून डॉ. सुबोध प्रभू यांनी काम सुरू केले. फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्रेनोबल येथील ब्रेनटेक संस्थेत ‘ट्रान्सलेशनल थेरपीज’ विषयातील संशोधक विद्यार्थ्यांचे सहमार्गदर्शक म्हणूनही ते काम पाहतात. ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
फोटो (०७०४२०२१-कोल-सुबोध प्रभू (फेलोशिप) : शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुबोध प्रभू यांची दि दलाई लामा फेलोशिपसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पी. एस. पाटील, विजय फुलारी आदी उपस्थित होते.
===Photopath===
070421\07kol_3_07042021_5.jpg
===Caption===
फोटो (०७०४२०२१-कोल-सुबोध प्रभू (फेलोशीप) : शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील ॲडजंक्ट प्रोफेसर डॉ. सुबोध प्रभू यांची दि दलाई लामा फेलोशीपसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी पी. एस. पाटील, विजय फुलारी, आदी उपस्थित होते.