शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
3
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
4
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
5
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
6
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
7
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
8
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
10
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
11
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
12
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
13
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
14
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
15
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
17
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
18
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
19
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
20
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

दलित वस्तीप्रश्नी महामार्ग रोखला

By admin | Published: May 08, 2016 12:29 AM

उदगावमध्ये आंदोलन : तहसीलदार, ग्रामपंचायत पदाधिकारी धारेवर; कोल्हापूर-सांगली महामार्ग ठप्प

जयसिंगपूर : उदगाव (ता़ शिरोळ) येथील दलित वस्ती गेल्या काही महिन्यांपासून सोयी-सुविधा न पुरविल्यामुळे दलदलीने व्यापली आहे़ याच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर-सांगली महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले़ दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासन, नायब तहसीलदार यांना धारेवर धरले़ दरम्यान, ग्रामपंचायतीचे लेखी पत्र, तहसीलदार पिलारी यांच्या ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़मात्र, चार दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित वस्तीतील नागरिकांनी दिला आहे़ येथील पूरग्रस्त हौसिंग सोसायटीच्या दलित वस्तीत गेल्या काही महिन्यांपासून सोयी-सुविधा मागासवर्गीय पंधरा टक्के रक मेतून पुरवा, अशी मागणी केली होती़ दरम्यान, ग्रामपंचायतीने मागासवर्गीय निधी अन्य ठिकाणी खर्च केला आहे. यामुळे दलित वस्तीचा विकास खुंटला आहे़ या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे निवेदन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमरदीप कांबळे यांनी जिल्हाधिकारी व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिले आहे़ दलित वस्तीतील प्रश्न सोडविण्यासाठी शनिवारी चर्चा आयोजित केली होती़ यावेळी नायब तहसीलदार वैभव पिलारी, प्रभारी बीडीओ डॉ़ कराळे, स.पो.नि. संतोष डोके, ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ झाल्याने संतप्त नागरिकांनी पदाधिकाऱ्यांना दलित वस्तीत झालेली दुरवस्था पाहण्यासाठी नेले़ यावेळी नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले़ नागरिकांनी एवढ्यावरच न थांबता सर्व पदाधिकांऱ्याच्या समोरच कोल्हापूर-सांगली महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले़ यावेळी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़यावेळी ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिल्यानंतर, तसेच नायब तहसीलदार यांनी चार दिवसांत दलित वस्तीप्रश्नी बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा ठोस निर्णय दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ यावेळी उपसरपंच प्रकाश बंडगर, शांताराम पाटील, भरत वरेकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ या आंदोलनात प्रेमनिहाल रांजणे, सुभाष उदगावे, प्रमोेद कज्जे, यांच्यासह कार्यकर्ते होते़ (प्रतिनिधी)