शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दलित कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

By admin | Published: May 10, 2014 12:15 AM

कोल्हापूर : राज्यभरात दलित समाजातील कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आलेल्या दलित

कोल्हापूर : राज्यभरात दलित समाजातील कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आलेल्या दलित कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हुल्लडबाजी केली. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तसेच वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी व छायाचित्रकारांना बसला. जिल्हाधिकार्‍यांनी रस्त्यावर येऊन आमचे निवेदन स्वीकारावे, असा आग्रहही त्यांनी धरला. जिल्हाधिकारी पुढे न गेल्याने त्यांचा निषेध करत मुख्य दरवाजावरच बांगड्या व निवेदन चिकटविण्यात आले. जिल्ह्यातील दलित समाजातील विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार दुपारी सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य दरवाजावर यावे, असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. मात्र, त्यावेळी जिल्हाधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांना निवेदन स्वीकारण्यास सांगितले. प्रथेप्रमाणे शिष्टमंडळाने आत यावे, असा निरोप पाठविण्यात आला. मात्र तो त्यांना मान्य केला नाही. जिल्हाधिकार्‍यांनी बाहेर यावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी कायम ठेवला. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी सुरू केली. रस्ता बंद करून येणा-जाणार्‍या नागरिकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना तसेच छायाचित्रकारांना शिवीगाळ केली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीही बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. मुख्य दरवाज्यावर बांगड्या व निवेदन चिकटवले आणि सर्व कार्यकर्ते निघून गेले.