जयसिंगपूर : येथील जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलच्या दक्षिण बाजूस असलेली संरक्षित भिंत पाडून साडेचार लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पंकज गुरव ( रा.जयसिंगपूर) याच्यासह अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सुरक्षारक्षक अनिल पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांत तक्रार दिली. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले असतानाही या आदेशाचा संशयितांनी भंग केला. बेकायदेशीर जमाव एकत्र करून डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टमध्ये असलेल्या जयप्रभा स्कूल जवळील सहा फूट उंचीची साडेचारशे फूट लांबीची भिंत लोखंडी पारेने पाडली.शिवाय संस्थाचालकावर जातीवाचक गुन्हा दाखल करण्याबरोबरच महाविद्यालयाची बस फोडण्याची धमकी संशयितांनी दिली.याप्रकरणी संशयित गुरव याच्यासह अज्ञात दहा ते पंधरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.