कोल्हापूर : मस्कुती तलाव परिसरात शुक्रवारी रात्री एका घरातील गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे घराचे सुमारे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धैर्याने पेटते गॅस सिलिंडर बाहेर आणून विझविल्याने मोठा अनर्थ टळला.मस्कुती तलाव परिसरात राहणाऱ्या सुशांत धोंडीराम सूर्यवंशी यांच्या घरात रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वयंपाक करीत असताना गॅस संपल्यामुळे सुशांत यांनी नवीन सिलिंडर जोडले. परंतु त्याचा रेग्युलेटर व्यवस्थित न जोडला गेल्याने त्यातून गॅसगळती सुरू झाली. शेगडी पेटवताच गॅस सिलिंडरनेही पेट घेतला आणि एकच गोंधळ उडाला. घरातील सर्व व्यक्ती सुरक्षित ठिकाणी पळून गेल्या.मस्कुती तलाव तरुण मंडळाचे कार्यकर्ते नीलेश पाटील, आशिष जाधव, रोहन गवळी, जयेश पाटील, निखिल जाधव, प्रकाश गवंडी यांना आग लागल्याचे कळताच त्यांनी तत्काळ सूर्यवंशी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी पेटते सिलिंडर बाहेर आणले; तर शेजारील सुजित पोवार यांनी आग विझविण्यासाठी लागणाऱ्या फायर एस्क्टिंग्युशरचा फवारा मारून आग विझविली. दरम्यान, महापालिका अग्निशमन दलाचे दोन बंबही तातडीने घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत आग विझली होती.घटना कळताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीमुळे प्रापंचिक साहित्य तसेच घराचे पंधरा ते २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
गॅस सिलिंडर पेटल्याने मस्कुती तलाव परिसरात घराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 2:18 PM
Cylinder, Fire, kolhapur मस्कुती तलाव परिसरात शुक्रवारी रात्री एका घरातील गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे घराचे सुमारे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धैर्याने पेटते गॅस सिलिंडर बाहेर आणून विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
ठळक मुद्देगॅस सिलिंडर पेटल्याने मस्कुती तलाव परिसरात घराचे नुकसान सुमारे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान