शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

धनगरवाड्यावर लागलेल्या आगीत ५ लाखांवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:22 AM

आजरा : आजरा तालुक्यातील चितळे-भावेवाडीपैकी धनगरवाड्यावर लागलेल्या आगीत अंदाजे ५ लाखांवर नुकसान झाले. आगीत दोन घरांसह शेती, अवजारे व ...

आजरा :

आजरा तालुक्यातील चितळे-भावेवाडीपैकी धनगरवाड्यावर लागलेल्या आगीत अंदाजे ५ लाखांवर नुकसान झाले. आगीत दोन घरांसह शेती, अवजारे व गवत जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, धनगरवाड्यावरील बाबू विठू कस्तुरे यांनी घराशेजारी बांधलेल्या शेडमध्ये जवळपास १ लाख पेंढी गवत रचून ठेवले आहे. दुपारी अचानक या शेडला आग लागली. आगीमध्ये कुस्तुरे यांचे जनावरांचे दोन गोठे व गवताचे शेड जळून खाक झाले. शेडमध्ये २५ हजार गवताचे भारे, शेती अवजारे भरून ठेवली होते. धनगरवाड्यावर अगोदरच पाण्याची वाणवा आहे. त्यातच आग लागल्याने धनगरवाड्यावरील नागरिकांनी घरातील पाणी व बोअरच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. सायंकाळी ५.३० वाजता गडहिंग्लज अग्निशमन दलाच्या गाडीने येऊन आग विझविली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही; पण शॉर्टसर्किटने आग लागली असण्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

-----------------------------

* पाच वर्षांत दुसऱ्यांदा आग

धनगरवाड्यावर गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा आग लागली. जनावरांचे गवत, शेती, अवजारे, घरगुती साहित्य जळून खाक झाले. पाच वर्षांपासून शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि धनगरवाड्यावर आग विझविण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था नाही.

--------------------------

* फोटो ओळी : चितळे-भावेवाडीपैकी धनगरवाड्यावर लागलेली आग. क्रमांक : ०७०२२०२१-गड-०५