उत्तम शेलार यांचे कोगे रोडच्या बाजूला आनंद नावाचे शेत आहे. येथे दीड एकरावर त्यांनी उसाची लागण केली आहे. गेल्या चार दिवसांपासून या क्षेत्रातील ऊस अज्ञाताने तणनाशक फवारल्यामुळे करपू लागली आहे. उसाच्या सरीमध्ये पाणी असूनही उसाचे पीक वाळू लागल्याने शेलार यांनी कृषी सहायक यांना ते पाहणी करण्यास बोलावले असता या पिकावर ग्लायसेल अथवा इतर तणनाशक फवारणी केली असल्यामुळे हे पीक वाळू लागले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील वर्षीही अज्ञातांनी उत्तम शेलार यांच्या याचं क्षेत्रावरील ऊस पिकावर तणनाशक फवारून ऊस पिकाचे नुकसान केले होते. यावर्षी पुन्हा असाच प्रकार घडल्याने सलग दुसऱ्या वर्षी शेलार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत उत्तम शेलार यांनी अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात उसावर तणनाशक फवारून पिकांचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
फोटो ---
कुडित्रे (ता. करवीर) येथे उत्तम शेलार यांच्या दीड एकर ऊस पिकावर तणनाशक फवारल्याने ऊस पीक वाळले असून शेजारील ऊस पीक तरतरीत दिसत आहे.