अणुस्कुरा : कांटेपासून चार किलोमीटर घनदाट जंगलामधून बुरंबाळ (ता. शाहूवाडी) या गावासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरील खडी पूर्णपणे बाहेर पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गटारी मातीने बुजल्यामुळे पावसाळ्यात पाणी रस्त्यावरून वाहत आहे, रस्त्यात ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन अवघड झाले आहे. दोन मोऱ्यांचा (लहान पूल) पाया खचून दगडांची पडझड झाली आहे. या रस्त्यावर बुरंबाळ नजीक भाताडीच्या ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे व पुलाच्या नळात गाळा अडकल्यामुळे पाणी पुलावरून वाहत आहे व पहिल्याच पावसात रस्ता आठ दिवस वाहतुकीस बंद होता. कांटे येथे चाळके यांच्या शेताजवळ मोठं मोठे दगड रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळ्यात ते कधीही ढासळण्याचा धोका निर्माण झाला.
चौकट : महानेटच्या ठेकेदारावर कारवाहीची मागणी
महानेटच्या खोदाईमुळे रस्त्याच्या साईडपट्टी खचल्या, मोऱ्यांच्या पुलांची पडझड झाली, महानेटची केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याची खोदाई केली आहे. त्यामुळे गटारी बुजून रस्त्यावर खूप चिखल झाल्याने वाहने चालवने अवघड झाले आहे. महानेटच्या ठेकेदाराला वारंवार सांगूनही त्यानेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्या ठेकेदारावर कारवार्इ करण्याची मागणी होत आहे.
फोटो ओळी: कांटे-बुरंबाळ रस्त्यावर खचलेली धोकादायक मोरी.