घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असते. कोणीतरी पकडेल या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतो. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू असल्याने वेग नियंत्रित न झाल्याने एखादी घटना घडते अन् बेकायदेशीरपणा उघडकीस येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रसंगी जीवितास धोका निर्माण होतो. शासनस्तरावरून बेकायदा वाळू वाहतुकीबाबत उपाययोजनांची कडक अंमलबजावणीची घटना टाळू शकेल, अन्यथा घटनास्थळावरील ग्रामस्थ आक्रमक बनल्यास त्याला वाळू वाहतूकदारच जबाबदार राहतील.सध्या बांधकाम क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी लागणाºया वाळूची कमतरता भासत आहे. वाळू उपश्यावरील बंधने व त्याची नियमावली यामुळे सर्वासमक्ष वाळू वाहतूक करणे जोखमीचे व आर्थिक अडचणीचे ठरते. यावर पर्याय म्हणून रात्रीच्यावेळी जादा वाळू भरून, कोणाच्या नजरेस न पडता ट्रॉली निश्चितस्थळी पोहोचविणे हे वाळू वाहतूकदारांचे ध्येय असते.यामुळेच रात्रीचा कालावधी त्यांना सोईस्कर वाटतो. यावेळी वाहने वेग घेतात.बºयाच वाहन चालकांना मद्यपानाचे व्यसन असते. त्यात वेग आणि रात्रीची वेळ अशा परिस्थितीत एखादी घटना घडते आणि आपली वस्तुस्थिती प्रकट होते; परंतु अशा घटनांमध्ये कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाला, मोठे आर्थिक संकट उभारले तर याला जबाबदार कोण? बºयाच वेळा दिवसा वाहतुकीवेळी आर.टी.ओ.च्या नजरेत आल्यास इतर राज्यांतील वाहनांचा परमिट, ओव्हरलोडचे कारण, रॉयल्टीच्या अनेक कारणांसाठी मोठ्या रकमेची कायद्याबाहेर तडजोड होते.
अन् वाळू वाहतुकीचा पुढील मार्ग मोकळा होतो. याचा फटका वाळू वाहतूकदारांना होतो.एखादी घटना घडल्यावर महसूल विभाग जागा होतो. पहाटेवेळी तपासणीचे दृश्य फिरावयास जाणाºयांना दिसते; परंतु शासकीय तपासणीस हा वाळू वाहतूकदारांच्या संबंधितच असल्याने यातपासणीत अधिकाºयांच्या नजरेत काहीही येत नाही. शासकीय यंत्रणा व वाळू वाहतूकदार यांच्या संगनमताने सुरू असलेला कारभार कायद्याच्या कडक अंमलबजावणीस पूरक ठरत नाही.
बेकायदा वाळू वाहतुकीने त्यांना आर्थिक नफा होईल; परंतु एखाद्या घटनेत कोणाच्या जीवितास धोका किंवा आर्थिक संकट ओढावल्यास अशा त्रयस्थांनाच याचा फटका बसणार आहे. त्यासाठी शासनाकडून कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधित घटनास्थळावरील ग्रामस्थ आक्रमक बनण्यास वाळू व्यापारीच जबाबदार राहतील.दोन वाहने, एकच नंबर महसूल बुडविण्याचा नवा फंडावाहने दोन. रंगसंगती एकसारखी. वाहन क्रमांकही दोन्हीचा एकच. दोन्हीतून वाळू वाहतूक. कमी परवाना जादा वाळू. एकाच वाहनाच्या क्रमांकाची वाळू रॉयल्टी भरून दोन वाहनांतून वाळू वाहतूक शासकीय अधिकाºयांच्या सहकार्याने सुरू करण्याचा फंडा सुरू असल्याची चर्चा शासकीय; परंतु मलिदा न पोहोचलेल्या कर्मचाºयांतून दबक्या आवाजात चालू आहे. शासनाचा महसूल शासकीय कर्मचाºयांकडून बुडविल्याची यंत्रणा यामुळे उघड होत आहे. याचा आर.टी.ओ.शोध लावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.