लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मद्य विक्रेत्यांची दुकाने पुन्हा सुरू व्हावीत, यासाठी रस्ते हस्तांतरास विरोध करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांना सोमवारी सकाळी महापौर दालनातच नगरसेवक व त्यांच्या समर्थकांकडून मारहाण झाली. मारहाणीत एकाचे कपडे फाटले. कार्यकर्त्यांनी महापौर कक्षातील हा वाद मोबाईलवर रेकॉर्डिंग केला; पण त्यांचा मोबाईल काढून घेऊन जबरदस्तीने रेकॉर्डिंग डिलिट करण्यास भाग पाडले. या घटनेवेळी महापौर हसिना फरास मात्र दालनात उपस्थित नव्हत्या.आज, मंगळवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर शहरातून जाणारे चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग असे पाच रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा सदस्य ठराव मंजुरीकरिता ठेवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाने अशा हस्तांतरास विरोध केला असून, तसे निवेदन यापूर्वी महापौर हसिना फरास यांना दिले होते. त्यावेळी महापौरांनी असा ठराव करणार नाही, अशी ग्वाही दिली होती. तरीही ठराव दाखल झाल्यामुळे महापौरांना विरोधाची आठवण करून देण्यासाठी ‘आप’चे दहा-बारा कार्यकर्ते सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या कार्यालयात गेले होते.‘आप’चे कार्यकर्ते कार्यालयात गेले, त्यावेळी महापौर हसिना फरास तेथे नव्हत्या. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा येण्यास अर्धा तास लागेल, तोपर्यंत कार्यालयात बसा, असा निरोप त्यांनी दिला. म्हणून कार्यकर्ते त्यांच्याच कार्यालयात बसले. काही वेळात महापौरांचे सुपुत्र माजी नगरसेवक आदिल फरास तेथे आले. त्यावेळी फरास यांनी कार्यकर्त्यांना का आलात, म्हणून विचारणा केली. ‘आप’चे कार्यकर्ते संदीप देसाई यांनी एकदमच ‘तुम्ही कोण?’असा सवाल केला. (पान ४ वर )घटनेमुळे कार्यकर्ते बिथरलेमहापौरांना भेटून निवेदन द्यायला गेलेल्या कार्यकर्त्यांवर असा अनपेक्षित हल्ला झाल्याने ते घाबरले. महापौर कार्यालयातून ते थेट आयुक्त अभिजित चौधरी यांना भेटायला गेले; पण तेही भेटले नाहीत. नारायण पोवार, जयवंत पोवार, संदीप देसाई, नीलेश रेडेकर, आप्पासो कोकीतकर, उत्तम पाटील, विश्वनाथ शेट्टी, आनंदराव वाणेर, एस्तेर कांबळे यांनी पत्रकारांना घडल्या प्रकाराची माहिती सांगितली. त्यावेळी सर्वजण घाबरलेले होते. कोणी-कोणी मारहाण केली, अशी विचारणा केली असता ‘नगरसेवकांचे समर्थक होते’ एवढेच त्यांनी सांगितले. कोणाचेही नावे घेण्याचे टाळले. आदिल यांच्याविरोधात तक्रार कोल्हापूर महापालिकेच्या महापौर हसिना फरास यांचा मुलगा आदिल फरास व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात ‘आम आदमी पार्टी’चे कार्यकर्त्ते संदीप देसाई यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा तक्रार अर्ज दिला. या अर्जानुसार आज, मंगळवारी आदिल फरास यांच्यासह कार्यकर्त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.झोंबाझोंबी अन् मारहाणही ‘आप’चे कार्यकर्ते आणि फरास यांच्यातील वाद वाढल्यामुळे अन्य पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी महापालिकेतच असलेले उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, संजय मोहिते, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, अश्पाक आजरेकर, आदी महापौर कार्यालयात आले.त्यातून वाद मिटण्याऐवजी तो एकमेकांना ‘अरे-तुरे’ म्हणण्यापर्यंत गेला. आधी नारायण पोवार यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. एकाने महापौर कक्षाचा दरवाजा बंद केला. आणि कार्यकर्त्यांशी झोंबाझोंबी सुरू झाली. त्यामध्ये संदीप देसाई यांच्या शर्टचे बटण तुटले. उत्तम पाटील नावाच्या कार्यकर्त्याने केलेले रेकॉर्डिंग सक्तीने मोबाईल काढून घेऊन डिलिट केले. त्यास दोन कानशिलात लगावल्या. सद्दाम देसाई यालाही मारहाण करण्यात आली. अखेर संभाजी जाधव, संजय मोहिते यांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांची सुटका केली.
कृषी सहायकांचे धरणे आंदोलन
By admin | Published: June 20, 2017 1:00 AM