शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

अंबाबाई देवीचे दर्शन शनिवारी बंद राहणार, गरूड मंडप उतरवला; नवरात्रौत्सवनिमित्त मंदिराची स्वच्छता सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:58 PM

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला. गेल्या २३ वर्षांपासून आय स्मार्ट ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला. गेल्या २३ वर्षांपासून आय स्मार्ट कंपनीच्यावतीने ही सेवा दिली जाते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मशीनरींचे पूजन झाले. शनिवारी (दि. २८) गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार असून त्या दिवशी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील. मंदिर आवारातील गरूड मंडप उतरवण्याचे काम सोमवारी पूर्ण झाले. त्यावर प्रतिकृती रूपात मांडव उभारून नवरात्रौत्सवाचे विधी केले जातील.नवरात्रौत्सव अवघ्या आठ दिवसांवर आल्याने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या अंबाबाई मंदिरातील तयारीला आता वेग आला आहे. मंदिर स्वच्छतेचे काम पुढील आठ दिवस चालेल. शनिवारी सरस्वती मंदिर येथे उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, बीव्हीजी तसेच रक्षक कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

कारंजा सुरू करण्याची मागणीअंबाबाई मंदिर आवारातील कारंजा गेली काही वर्ष बंद असून नवरात्रौत्सवात तो पुन्हा सुरू करावा अशी मागणी व्हाइट आर्मी संस्थेने केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात उत्सव काळात महिलांसह लहान मुलेदेखील मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा असतो. मात्र कारंजामुळे परिसरातील वातावरण आल्हाददायक व प्रसन्न राहील, तरी कारंजा सुरू करावा असे म्हटले आहे.

मुख्य रांगेवर मांडव उभारणीकोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाज्यातील मुख्य दर्शन रांगेवर मांडव उभारणीचे काम सध्या सुरू आहे. यासह बॅरिकेडस लावण्यात येत आहेत. ही रांग पुढे जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत नेण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर