दत्तवाड (ता. शिरोळ) हे मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. या गावातील बाजारपेठेला कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी व ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात. शेजारी असलेल्या मलिकवाड येथूनही शेतकरी याच रस्त्याचा वापर करतात. मात्र हा रस्ता सध्या खड्डेमय झाला असून जागोजागी रस्ता खचला आहे. यामुळे हा आंतरराज्य रस्ता आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दत्तवाडपासून दुधगंगा नदीपर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता संपूर्ण खड्डेमय आहे. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. दुधगंगा नदी पलिकडे कर्नाटक राज्याने संपूर्ण रस्ता डांबरीकरण केला आहे. मात्र महाराष्ट्र हद्दीतील रस्ता कधी होणार याकडे वाहनधारकांचे आता लक्ष लागले आहे.
फोटो - ०६०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - दत्तवाड-मलिकवाड हा आंतरराज्य मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे.