तानाजी घोरपडेहुपरी : येथील जवाहर साखर कारखाना परिसरातील जोतिबा मंदीर नजीकच्या दूधगंगा डाव्या कालव्यात सुमारे 40 फुट खोल पाण्यात चारचाकी (एम.एच-12-ई.टी-1762) गाडीसह एकाचा मृतदेह आढळून आला. मोतीराम महादेव रजपूत असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले आहे. मात्र, ही घटना घातपात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. जवाहर साखर कारखाना परिसरातील जोतिबा मंदिर नजीकच्या दूधगंगा डाव्या कालव्यात सुमारे 40 फुट खोल पाण्यात काही ग्रामस्थांच्या कार निदर्शनास आली. याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली. गाडीच्या काचा फोडून तपासणी केली असता गाडीत मोतीराम रजपूत यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले असून ही घटना घात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, या भागातील एक तरुण गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. या घटनेचे गुढ उकलण्यासाठी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.
kolhapur news: हुपरी नजीकच्या कालव्यात बेवारस कारमध्ये मृतदेह आढळला, घात की अपघात? पोलिस तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 1:26 PM