कोल्हापूर : राज्यातील सर्व विभागांच्या प्रशासकीय बदल्यांची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत आधी ३१ जुलै २०२० पर्यंत होती.याआधी सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रकारच्या प्रशासकीय बदल्या करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे सर्वच विभागांनी बदल्यांची तयारी सुरू केली होती. अनेक जिल्हा परिषदांनी समुपदेशनाच्या माध्यमातून बदल्या करण्यासाठी वेळापत्रकही जाहीर केले होते. परंतु वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे अनेक जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परिणामी ही प्रक्रिया पार पाडण्यामध्येही अडथळे आले आहेत.याच परिस्थितीचा विचार करून आता या बदल्या ३१ जुलैऐवजी १० ऑगस्टपर्यंत करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया १० ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
प्रशासकीय बदल्यांची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 3:23 PM
राज्यातील सर्व विभागांच्या प्रशासकीय बदल्यांची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत आधी ३१ जुलै २०२० पर्यंत होती.
ठळक मुद्देप्रशासकीय बदल्यांची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवलीवाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे अनेक जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन