शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:44 PM

कोल्हापूर : सुदृढ आरोग्यासाठी ‘क्रॉस द लाईन’ या टॅगलाईनने कोल्हापुरात होणाऱ्या या वर्षीच्या ‘ लोकमत महा मॅरेथॉन’मधील सहभागासाठी आता ...

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतएकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी; विविध पाच गटांमध्ये आयोजन

कोल्हापूर : सुदृढ आरोग्यासाठी ‘क्रॉस द लाईन’ या टॅगलाईनने कोल्हापुरात होणाऱ्या या वर्षीच्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मधील सहभागासाठी आता बुधवार (दि. २५ डिसेंबर)पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येईल. विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यासह धावपटूंना आकर्षक मेडलही मिळणार आहे.या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. कोल्हापुरातील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता ‘लोकमत मॅरेथॉन’ची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन,’ १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे.

१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा.

प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य

  • ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने चालणे, धावणे, आदी स्वरूपांतील व्यायाम करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने मॅरेथॉन महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. ‘लोकमत’ने कोल्हापुरात महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. त्यात जास्तीत जास्त नागरिक, धावपटूंनी सहभागी व्हावे.- संदीप मोगे,सदस्य, आयएम फिट.

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये गेल्या वर्षी आम्ही ग्रुपने सहभागी होऊन राजाराम तलाव संवर्धनाबाबतचा संदेश दिला होता. यावर्षीदेखील आम्ही ग्रुपने सहभागी होणार आहोत. या महामॅरेथॉनचे नियोजन उत्कृष्ट असते. त्यातून एक आरोग्यदायी, आनंददायी अनुभव मिळतो. या महामॅरेथॉनमध्ये धावपटू, नागरिकांनी सहभागी होऊन या अनुभवाची प्रचिती घ्यावी.- आशिष रावळू, आयर्नमॅन

कोल्हापूरकर आरोग्याबाबत अधिक सजग होत आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीने व्यायाम सुरू केला, तर सर्व कुटुंब त्या दृष्टीने विचार करून कार्यरत होते. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने वर्कआऊट करणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ची महामॅरेथॉन खूप चांगल्या पद्धतीने होते. त्यामध्ये जास्तीत जास्त धावपटू, नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे.- अश्विन भोसले, प्रशिक्षक, ए. बी. एंड्युरन्स

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमतkolhapurकोल्हापूर