बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत, परंतु यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले नव्हते. याबद्दल विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास कमीत कमी पाच दिवसांचा कालावधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी मंत्री सामंत यांच्याकडे दि. ५ ऑगस्टला केली होती. संदर्भात मंत्री सामंत यांनी मंगळवारी अधिकृत घोषणा केली आहे. गुरुवार ते सोमवार या पाच दिवसांसाठी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर यापूर्वी ज्यांनी नोंदणी केली आहे, पण त्यांना अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची आहे, त्यांच्यासाठी शनिवारी (दि.१४) आणि रविवारी (दि.१६) संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी (www.mahacet.org) या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’चा अर्ज भरण्यास सोमवारपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:29 AM