गारगोटी,
नितवडे, ता भुदरगड येथील शेत मजूर अशोक गोविंदा गुरव (वय ३४) हा वासनोली, ता भुदरगड येथील शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत ची वर्दी अशोक लक्ष्मण राऊळ (रा मेघोली,ता. भुदरगड )यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.
अधिक माहिती अशी नितवडे येथील शेतकरी अशोक गोविंदा गुरव हा शुक्रवारी(दि १९)रोजी दुसऱ्याचे शेतात मजुरीसाठी गेला होता. तेथून तो कोणालाही काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो घरी परत न आल्याने सगळीकडे शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. शनिवारी(दि २०) रोजी सकाळपासून त्याचा शोध सुरू झाला. तो दुपारी १२.३०च्या सुमारास वासनोली येथे रस्त्याच्या बाजूच्या शेतात अशक्त अवस्थेत बसलेला दिसून आला. त्याला औषधोपचारासाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याच्यावर औषधोपचार होण्यापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगड पोलीस करीत आहेत.
फोटो
अशोक गुरव