पाणी काळे बनल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले आहेत. परंतु, अहवाल न मिळाल्यामुळे पाणी नेमके कशामुळे काळे बनले हे समजलेले नाही. परंतु, माशांच्या मृत्यूमुळे नागरिकांत पाणी प्रदूषित झाल्याची चर्चा आहे.
गिजवणे बंधाऱ्याजवळच गडहिंग्लज शहराला पाणीपुरवठा करणारा जॅकवेल आहे. त्यामुळे पालिकेचे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (१६) बंधाऱ्यावर जावून पाहणी केली. बंधाऱ्याजवळ पाण्याचा प्रवाह संथगतीचा असून पाणी एकाच ठिकाणी तुंबून राहिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी काळे दिसत असावे आणि पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
पाण्याचे नमुने तपासा
पाण्याचे नमुने तपासणी करून माशांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे सांगावे. पाणी प्रदूषित झाले असल्यास संबंधितांवर जलप्रदूषण कायद्यातंर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी निवेदनातून प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे केली आहे.