शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

देवकर पाणंदमधील एकाचा ‘स्वाइन’ने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:32 AM

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी तापाच्या आजाराने उपचारासाठी दाखल झालेल्या देवकर पाणंदमधील एकाचा उपचार सुरू असताना बुधवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. कैलास मनोहर पवार (वय ५७, रा. देवकर पाणंद) असे त्यांचे नाव आहे; त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या २३ वर पोहोचली आहे.देवकर पाणंदमधील कैलास पवार यांना तापाची लागण झाल्याने त्यांना ...

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी तापाच्या आजाराने उपचारासाठी दाखल झालेल्या देवकर पाणंदमधील एकाचा उपचार सुरू असताना बुधवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. कैलास मनोहर पवार (वय ५७, रा. देवकर पाणंद) असे त्यांचे नाव आहे; त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या २३ वर पोहोचली आहे.देवकर पाणंदमधील कैलास पवार यांना तापाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना शनिवारी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती त्यांचे रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असता, त्यांंना स्वाइन फ्लू या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातून बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.सध्याच्या स्थितीत कोल्हापूर शहरातील सीपीआरसह खासगी रुग्णालयांत स्वाइनच्या ५६ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी ३८ रुग्णांना स्वाइनची लागण झाल्याचे रक्त तपासणीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बुधवारी सीपीआर रुग्णालयातील स्वाइन फ्लूच्या खास कक्षात १५ नवीन रुग्णांची भर पडली. त्यांपैकी आठजणांचे रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.