सांगली : शहरातील साखर कारखाना परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर येथील कोरोनामुक्त रूग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाचे निदान झाल्याने त्याच्यावर मिरज कोवीड रूग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असलातरी त्यास फफ्फुसाचा क्षयरोग असल्याने त्याच्यावर तिथेच उपचार सुरू होते. व्हेंटीलेटरवर असलेल्या या रूग्णाचा रविवारी मृत्यू झाला आहे.
साखर कारखाना परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोवीड रूग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता मात्र, इतर आजारामुळे या व्यक्तीची प्रकृती गंभीर होती.
कोरोनातून मुक्त झाला असलातरी त्याला क्षयरोग असल्याने तिथेच उपचार सुरू होते. प्रकृती अधिक गंभीर बनल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.